vidarbha twitter
Sports

Vijay Hazare Trophy: महाराष्ट्राचा पराभव! शानदार विजयासह विदर्भाचा फायनलमध्ये प्रवेश

Vidharbh vs Maharashtra,Vijay Hazare Trophy Semi Final: विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात विदर्भाने महाराष्ट्राचा पराभव करत फायनलचं तिकिट मिळवलं आहे.

Ankush Dhavre

विदर्भाचा संघ विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करणार दुसरा संघ ठरला आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात विदर्भाने शानदार विजयाची नोंद करत फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे.

आता स्पर्धेतील फायनलच्या सामन्यात विदर्भ आणि कर्नाटक संघ भिडणार आहेत. हा सामना १८ जानेवारीला वडोदरातील कोटांबी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

दुसऱ्या सेमी फायनलच्या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. आधी विदर्भाच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ३०० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रानेही चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र महाराष्ट्राचा संघ हा सामना जिंकू शकला नाही. अखेर विदर्भाने बाजी मारत फायनलचं तिकीट कन्फर्म केलं.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वडोदरातील कोटांबी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून विदर्भ संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकला. कारण विदर्भाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ५ गडी बाद ३८० धावांचा पाठलाग करण्यासाठी उभारला.

या सामन्यात फलंदाजी करताना सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या ध्रुवने १२० चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ११४ धावांची तुफानी खेळी केली. तर यशने ११६ धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी २२४ धावा जोडल्या. त्यानंतर इनफॉर्म करुण नायर फलंदाजीला आला. त्याने ताबडतोड ८८ धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्राला ३११ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना महाराष्ट्राने ६९ धावांनी गमावला. महाराष्ट्राकडून अर्शीन कुलकर्णीने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT