Virat Kohli Video  BCCI
Sports

Video : अच्छा! म्हणून विराट असा आऊट होतो का? बीसीसीआयच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

IND vs AUS 3rd Test : बीसीसीआयने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.

Chandrakant Jagtap

IND vs AUS 3rd Test : विराट कोहली हा सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. कसोटी क्रिकेट असो एकदिवस किंवा टी-20 सर्वच फॉर्मॅटमध्ये विराटची कामगिरी उल्लेखनीय आहे. परंतु अनेकदा विराट कोहली स्लीपमध्ये बाद झाला आहे. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोल देखील व्हावे लागले आहे.

बीसीसीआयने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. यात काही खेळाडू तिसऱ्या स्लीपमध्ये झेल पकडण्याचा सराव करत आहेत. परंतु त्यांच्याकडे झेल देणारा खेळाडू विराट कोहली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यूजर्सच्या गमतीशीर कमेंट्स

एका यूजरने लिहिले की विराट एज लागून बाद होण्याची प्लॅनिंग करत आहे, तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलेल की, 'आज मला समजलं भाई कट लागून एवढ्या वेळा बाद का होतो'. एका यूजरने लिहिले की कोहलीने स्वत: देखील स्लीपमध्ये कॅच घेण्याचा सराव करायला हवा, गेल्या काही सामन्यांपासून तो खूपच कॅच सोडत आहे. एका यूजरने लिहिले की कोहली भाई पुढच्या सामन्यात स्लीमध्ये कॅच आऊट नको होऊ भाई. (Latest Sports News)

विराट नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. 1 मार्चपासून होणाऱ्या या कसोटी सामन्यात विराट कोहली एक खास विक्रम करण्याच्या जवळ आहे. जर त्याने 1 झेल पकडला तर तो भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय झेल पकडणारा दुसरा खेळाडू बनेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत राहुल द्रविड पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहली इंदूरमध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील तिन्ही फॉरमॅटमधील ४९३ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे 1 झेल घेऊन एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवण्याची सुवर्णसंधी असेल. विराट कोहलीने टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 299 झेल पकडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT