Varanasi Cricket Stadium Saam tv
क्रीडा

Varanasi Cricket Stadium: डमरूसारखं पव्हेलियन, त्रिशूळासारख्या लाईट्स; देवांच्या काशीत 'असं' भव्यदिव्य क्रिकेट स्टेडियम होणार, पाहा झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात भवदिव्य क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे.

Vishal Gangurde

International Cricket Stadium in Varanasi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात भवदिव्य क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. वाराणसीच्या गंजारी येथे ३२५ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. या क्रिकेट स्टेडियमची हटके झलक समोर आली आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच वाराणसी दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्याकडून 23 सप्टेंबर रोजी या स्टेडियमची पायाभरणी करण्यात येणार आहे. वाराणसीतील या स्टेडियममध्ये काशीची संस्कृती पाहायला मिळणार आहे.

गंजारी येथे बांधण्यात येणारं स्टेडियम खूप आकर्षकरित्या बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वाराणसीला भगवान शिवाची नगरी बोललं जातं. त्यामुळे या स्टेडियमला शिवमय बनवण्याचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाराणसीच्या गंजारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी जमीनही संपादित करण्यात आली आहे. स्टेडियम हे ३०.६ एकरवर बांधण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ३०००० प्रेक्षकांना बसण्याची आसनव्यवस्था करण्यात येणार आहे.

या स्टेडियममध्ये सात खेळपट्ट्या बांधण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये कॉमेट्री बॉक्स, प्रेस गॅलरी अशा अनेक सुविधा स्टेडियममध्ये असणार आहे.

स्टेडियम केव्हा तयार होणार?

स्टेडियम बांधण्यासाठी २ वर्षांचा अवधी लागणार आहे. स्टेडियम बांधण्यासाठी ३२५ कोटींचा अंदाजित खर्च लागणार आहे. या स्टेडियमध्ये काशीची संस्कृती पाहायला मिळणार आहे. तर या स्टेडियमचं छत हे भगवान शिवाच्या अर्धचंद्रासारखं तयार करण्यात येणार आहे. तर त्रिशूळासारखे लाईट्स असणार आहेत. स्टेडियमच्या द्वाराची डिझाईन ही बेलपत्रासारखी करण्यात येणार आहे.

पव्हेलियन डमरूसारखं तयार करण्यात येणार आहे. या क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणीचा कार्यक्रमाचा विषय नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या स्टेडियमवर अनेक बडे सामने होणार आहेत. या स्टेडियममुळे रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. तसेच शहरासहित ग्रामीण भागातील लोकांनाही याचा फायदा होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT