Vaibhav Suryavanshi  Saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi : गुजरातविरोधात बॅट तळपली, मुंबईविरोधात गारठली; चहरने वैभव सूर्यवंशीला गुंडाळलं, शून्यावर बाद

Vaibhav Suryavanshi News : गुजरातविरोधात आक्रमक फलंदाजी केलेल्या वैभव सूर्यवंशीचा मुंबईविरोधात रंग उडाला. वैभव मुंबईविरोधात शून्य धावांवर बाद झाला.

Vishal Gangurde

वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्स विरोधात ३५ चेंडूत शतक ठोकलं होतं. मात्र, आज गुरुवारी मुंबई इंडियन्सविरोधात काहीच चाललं नाही. मुंबईचा जलद गोलंदाज दीपक चहरने पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीला गारद केलं. दीपक चहरच्या भेदक माऱ्यापुढे वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद झाला. चहरच्या दुसऱ्या चेंडूत वैभव झेलबाद झाला. मागच्या सामन्यात हिरो ठरेलल्या वैभवला सामन्यात खातं उघडता आलं नाही.

दीपक चहरच्या युक्तीपुढे वैभव फेल ठरला. दीपकने वैभव सूर्यवंशीला फूल पिच चेंडू फेकला. त्यामुळे दीपकचा चेंडू न समजलेला वैभव झेलबाद झाला. मिड ऑनवर उभ्या असलेल्या विल जॅक्सने कॅच पकडली. शून्यावर बाद होताच वैभव सूर्यवंशी नाराज झाला. वैभव सूर्यवंशीचं तोंड रडण्यासारखं झालं.

१४ वर्षांच्या वैभवने मागील सामन्यात ३५ चेंडूत शतक ठोकलं होतं. वैभवच्या विकेटचं नुकसान राजस्तान रॉयल्सला झेलावं लागलं. वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल १३ धावा करून बाद झाला. यशस्वीने दोन षटकार लगावले. यशस्वीने दोन षटकार लगावल्यानंतर बोल्टने यशस्वीला बोल्ड केलं. नीतीश राणालाही बोल्टने गुंडाळलं. कर्णधार रियान परागला बुमराहने बाद केलं. बुमराहने पहिल्याच चेंडूत शिमरॉन हेटमायरला बाद केलं. यामुळे पॉवरप्लेमध्ये राजस्थानने ५ गडी गमावले.

मुंबईचा मोठा विजय

मुंबईने गुजरातला २० षटकात २१७ धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईसाठी रयान रिकल्टनने सर्वाधिक ६१ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माने ५३ धावा केल्या. राजस्थानकडून तीक्षणा आणि परागने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ११७ धावांवर गारद झाला. राजस्थान रॉयल्सचा संघ १०० धावांनी पराभूत झाला. या विजयामुळे मुंबईचा संघ पाँइट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT