ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलू कचोरी बनवण्याकरिता योग्या पीठ निवडणे गरजेचे आहे. रिफाइंड पीठ किंवा गव्हाच्या पीठाने आलू कचोरी बनवू शकता.
कचोरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना तूप किंवा तेलाचा वापर करावा.
तसेच बटाट्याच्या सारणात मसाल्यांचे योग्य प्रमाण असावे. हळद, धणे, मीठ आणि सुक्या आंब्याची पावडर हे मसाले सारणामध्ये आवश्यक आहेत.
कचोरी चांगली घट्ट भरता यावी म्हणून बटाट्याचे सारण चांगले मॅश करुन घ्या त्यात गुठल्या राहू देऊ नका.
कचोरी तळताना ती मंद आचेवर तळा जेणेकरुन ती आतून शिजली जाईल.
कचोरी गोल आणि समान आकारात लाटा म्हणजेच समानरीत्या शिजण्यास मदत होईल.
गरमागरम बटाट्याची कचोरी चटणी, भाजी आणि दही सोबत सर्व्ह करा आणि खाण्याचा अस्वाद घ्या.
तळण्याऐवजी तुम्ही एअर फ्रायरमध्ये कचोरी बनवू शकता, त्यात कॅलरीज कमी असतात.