vaibhav suryavanshi explosive century acc u19 asia cup saam tv
Sports

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6....वैभव सूर्यवंशीनं पाडला षटकारांचा पाऊस; UAE विरुद्ध ठोकलं तुफानी शतक

Vaibhav suryavanshi century : ACC मेन्स अंडर 19 आशिया कप २०२५ मधील पहिल्याच सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं तुफानी शतक ठोकलं. या इनिंगमध्ये त्यानं चौकार- षटकारांची आतषबाजी केली.

Nandkumar Joshi

Vaibhav suryavanshi Fastest century : एसीसी मेन्स अंडर १९ आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) आमनेसामने आले. दुबईच्या आयसीसी अॅकडमीच्या मैदानात ही लढत झाली. या सामन्यात भारतीय संघाचा युवा आणि स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीनं तुफानी खेळी केली. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्यानं नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत शतक ठोकलं. या दरम्यान वैभव सूर्यवंशीला जीवदान मिळाले. या संधीचं त्यानं सोनं केलं आणि दुबईत षटकारांचा पाऊस पाडला.

वैभव सूर्यवंशी सलामीला आला. त्यानं सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. मैदानात जम बसल्यानंतर त्यानं षटकारांचा पाऊस पाडला. अवघ्या ३० चेंडूंत त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर तो थांबला नाही. त्यानं मैदानाच्या चौफेर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अवघ्या ५६ चेंडूंत त्यानं आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीत त्यानं पाच चौकार आणि नऊ षटकार तडकावले.

या शतकी खेळीदरम्यान वैभव सूर्यवंशीला दोन जीवदान मिळाले. त्याच्या वैयक्तिक २८ धावा असताना संयुक्त अरब अमिरातच्या खेळाडूंनी त्याला पहिली संधी दिली. तर ८५ धावांवर खेळत असताना त्याचा आणखी एक झेल सोडला. त्यानंतर त्यानं शतकी खेळी केली. विशेष म्हणजे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्यानं स्ट्राइक रेट वाढवला. त्यानं धावा खोऱ्यानं ओढल्या. संयुक्त अरब अमिरातच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

वैभव सूर्यवंशीनं याआधी रायझिंग स्टार्स आशिया कप २०२५ मध्येही एक स्फोटक खेळी केली होती. या स्पर्धेतही त्यानं यूएईविरोधात ४२ चेंडूंमध्ये १४४ धावा कुटल्या होत्या. त्यात १५ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. अवघ्या ३२ चेंडूंत त्यानं आपल्या १०० धावा पूर्ण केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी घरगुती हे सीरम करा ट्राय, आठवड्याभरात दिसेल फरक

गृहयुद्धामुळे हाहाकार, रुग्णालयात एअर स्ट्राईक 30 जणांचा मृत्यू, 70 जखमी

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका, दोन्ही देशांकडून तुफान गोळीबार

SCROLL FOR NEXT