vaibhav suryavanshi news Saan tv
Sports

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

vaibhav suryavanshi news : वैभव सूर्यवंशी चमकला आहे. त्याने १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. अर्धशतक ठोकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Vishal Gangurde

राजस्थान रॉयल्ससाठी वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी

वैभव सूर्यवंशीकडून १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण

वैभवच्या फलंदाजीमुळे राजस्थानचा विजय सोपा

आयपीएल स्पर्धेत २०२६ आज सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले आहेत. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फंलदाजासाठी उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला राजस्थान रॉयल्सने १२७ धावांत गुंडाळलं. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला १२८ धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सामन्याच्या पॉवरप्ले झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. वैभवने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. वैभव १७ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलच्या इतिहासातील तिसरं जलद अर्धशतक ठोकलं आहे. त्याने चेन्नई गोलंदाजांचा सामना करताना चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. त्याने ५ षटकार आणि ४ चौकार लगावले.

वैभवने चेन्नईचा गोलंदाज मॅट हेनरी आणि खलील अहमदची जोरदार धुलाई केली. मैदानातील चाहत्यांनी अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशीच्या फलंदाजीचं कौतुक केलं. त्याने १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्याने राजस्थान रॉयल्सचा विजय सोपा झाला.

सामन्याच्या सुरुवातीला रविंद्र जडेजाने सरफराज खान आणि शिवम दुबेला बाद केले. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी केली. या सामन्यात चैन्नईविरुद्ध राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला.

वैभव सूर्यवंशी वयाच्या १३ व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने १.१० कोटी रुपयांना खरेदी केली होती. ऑक्शनमध्ये सर्वात खेळाडू ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT