Vaibhav Suryavanshi Age Controversy X
Sports

वैभव सूर्यवंशी खरंच १४ वर्षांचा आहे का? जुन्या मुलाखतीमुळे शतकवीरावर होतायेत फसवणूकीचे आरोप; काय आहे सत्य?

Vaibhav Suryavanshi Age Controversy : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये ३५ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. ही ऐतिहासिक कामगिरी केल्यापासून वैभव चर्चेत आहे. दरम्यान एका जुन्या मुलाखतीच्या व्हिडीओमुळे वैभव सूर्यवंशीवर फसवणूकीचे आरोप केले जात आहेत.

Yash Shirke

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने १९ एप्रिल रोजी राजस्थान विरुद्ध लखनऊ या सामन्यामधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. १४ वर्षांच्या वैभवने गुजरात विरुद्ध खेळताना ३५ चेंडूत १०० धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात तो सर्वात कमी वयात कमी चेंडूत शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. या शतकीय कामगिरीनंतर वैभव चर्चेत आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी वैभवची पाठ थोपटली आहे.

आयपीएल ऑक्शनमध्ये ज्या वेळेस राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला आपल्या ताफ्यात सामील केले, तेव्हा तो १३ वर्षांचा होता. आयपीएलमध्ये डेब्यू करण्याआधी त्याने १४ वा वाढदिवस साजरा केला. ३५ चेंडूमध्ये शतकीय कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण त्यासोबतच वैभवच्या वयावरुन काहीजणांनी शंका व्यक्त केली आहे. एका व्हायरल व्हिडीओवरुन वैभव सूर्यवंशीने वय लपवले आहे, लोकांना वयाबद्दल खोटी माहिती दिली, असे आरोप केले जात आहेत.

वैभव सूर्यवंशीने २०२३ मध्ये बेनीपट्टी हायस्कूलमध्ये झालेल्या क्रिकेट टूर्नामेंटदरम्यान एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच वैभवला त्याचे वय विचारले जाते. उत्तर देताना वैभव म्हणतो, 'सप्टेंबरमध्ये मी १४ वर्षांचा होईन.' २०२३ मध्ये वैभव १४ वर्षांचा होणार होता, तर मग आता २०२५ मध्येही तो १४ वर्षांचा कसा असा सवाल विचारत वैभववर फसवणूकीचे आरोप केले जात आहेत.

याआधीही वयाच्या मुद्द्यावरुन वैभव सूर्यवंशीवर टीका झाली होती. तेव्हा वैभवच्या वडिलांनी वयासंबंधित प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले होते. वैभव जेव्हा आठ वर्षांचा होता तेव्हा त्याची अधिकृत हाडांची चाचणी म्हणजेच बोन टेस्ट करण्यात आली होती. ही चाचणी तरुणांचे वय तपासण्यासाठी केली जाते. वैभव खरोखरच १४ वर्षांचा आहे. त्याचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला. चार वर्षांचा असताना त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तर नवव्या वर्षी तो क्रिकेट अकादमीमध्ये गेला, अशी माहिती वैभवच्या वडिलांनी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT