अमेरिकेचा विस्फोटक फलंदाज आरोन जोन्स सध्या तुफान चर्चेत आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात या फलंदाजाने ९४ धावांची खेळी करत अमेरिकेला विजयाचं खातं उघडून दिलं. कॅनडाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने वेस्टइंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ipl
अमेरिकेला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कॅनडाचा संघ मजबूत स्थितीत होता. मात्र त्यानंतर जोन्स चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला आणि त्याने एकहाती सामना फिरवला.
कॅनडाविरुद्ध झालेल्या सामन्यात जोन्सने १० षटकार खेचत ख्रिस गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. यापूर्वी ख्रिस गेलने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात ११ आणि २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात १० षटकार मारले होते. यासह जोन्स हा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच डावात सर्वाधिक षटकार खेचणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कॅनडाने २० षटकअखेर १९४ धावा केल्या. या संघाकडून फलंदाजी करताना नवनीत धालीवालने ४४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली.
अमेरिकेला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. मात्र त्यानंतर आरोन जोन्स आणि अँड्रीस गुसने अर्धशतकी खेळी केली आणि शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. हा अमेरिकेचा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच विजय ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.