620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

Eknath Shinde office deputation employees issue Maharashtra: मंत्र्यांकडे तोंडी आणि उसनवारी तत्त्वावर कार्यरत असणारे कर्मचारी त्यांच्या मूळ विभागात कधी जाणार हा प्रश्नच आहे. कारण आदेशाला महिना लोटला तरी कर्मचारी मंत्र्यांकडेच तळ ठोकून आहेत. अशा किती अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्य सचिवांच्या आदेशाला जुमानलं नाही? अतिरीक्त कर्मचाऱ्यांबाबत एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाची काय भूमिका आहे?
MAHARASHTRA DEPUTATION EMPLOYEES: 150 OFFICERS STILL IN MINISTERS' OFFICES
MAHARASHTRA DEPUTATION EMPLOYEES: 150 OFFICERS STILL IN MINISTERS' OFFICESsaam tv
Published On: 

मंत्र्यांकडे तोंडी आणि उसनवारी तत्त्वावर कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी आदेशानंतरही मंत्रालयात ठाण मांडून आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल य़ांनी या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात पाठवण्याचा आदेश दिला होता. २५ ऑगस्ट रोजी आदेश काढले होते. म्हणजेच आता महिना उलटला तरी डेप्युटेशनवर असलेले दीडशे अधिकारी अजूनही मंत्र्यांकडेच तळ ठोकून असल्याची सुत्रांची माहिती आहे.

आदेशानंतरही 620 पैकी जवळपास150 अधिकारी अजूनही मंत्र्यांकडेच कार्यरत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी मंजूर असलेल्या 72 पदांपैकी 18 पदं रिकामी आहेत. त्यातच शिंदे यांच्या कार्यालयानं उसनवारीवरील 30 कर्मचारी सोडण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या कार्यालयात केवळ 2 अतिरिक्त कर्मचारी आढळून आलेत. तर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या कार्यालयासाठी 16 पदांची मंजूरी असताना तेथे तब्बल 70 अधिकारी-कर्मचारी उसनवारीवर काम करीत होते. मात्र त्यांना परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

धोरणात बसणाऱ्या अधिकाऱ्यांचे समायोजन केले जाणार आहे. अन्य कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या मूळ विभागात पाठवावे लागणार आहे. राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात मनुष्यबळाची आणि तितकीच शिस्तीची गरज आहे. त्यामुळे तोंडी किंवा उसनवारीवरील कर्मचाऱ्यांची घर वापसी कधी होणार ? न ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाईचा बडगा उगारणार का?ते पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com