Shardul Thakur saam tv
Sports

Shardul Thakur: अनसोल्ड ते पर्पल कॅपपर्यंत...! IPL खेळण्याची आशा सोडलेल्या शार्दूलला कशी मिळाली LSG मध्ये संधी?

Shardul Thakur LSG: ऋषभ पंतच्या कुशल नेतृत्वात लखनऊने हैदराबादचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात खरा स्टार ठरला तो मराठमोळा खेळाडू शार्दूल ठाकूर. आयपीएल लिलावात कुणालाही न विकला गेलेला शार्दूलने आपल्या अप्रतिम कौशल्याने सर्वांना थक्क केले आणि आता तो पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएलच्या ७ व्या सामन्यात गुरुवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामना खेळवला गेला. या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊने ५ विकेट्सने हैदराबादला मात दिली. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो मराठमोळा शार्दूल ठाकूर. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेला शार्दूलने त्याची जादूची कांडी अशी फिरवली की तो आता थेट पर्पल कॅपसाठी अग्रस्थानी आहे.

हैदराबादच्या सामन्यात महत्त्वाचे ४ विकेट्स काढल्यानंतर लखनऊच्या ताफ्यात अचानक आपली एन्ट्री कशी झाली याबाबत शार्दूलने खुलासा केला आहे. मेगा ऑक्शनमध्ये हा स्टार भारतीय गोलंदाज विकला गेला नाही. यानंतर, लखनऊ सुपर जायंट्सने त्याला जखमी मोहसीन खानच्या जागी टीममध्ये समाविष्ट केलं होतं. यावेळी एका महत्त्वाच्या आणि मोठ्या व्यक्तीचा मला फोन आला आणि टीममध्ये माझी एन्ट्री झाली असं शार्दूलने सांगितलं आहे.

शार्दूलने आशा सोडल्या होत्या

प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड झालेल्या शार्दूलला विचारण्यात आलं की, लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर या सिझनमध्ये आयपीएलमध्ये खेळेल असं त्याला वाटलं होतं का? यावर शार्दुल म्हणाला, "खरं सांगायचं तर नाही. यानंतर मी माझ्या पुढच्या योजना देखील आखून ठेवल्या होत्या. आयपीएलमध्ये निवड झाली नाही, तर मी काउंटी क्रिकेट खेळण्याचाही विचार करत होतो.

'या' व्यक्तीने फोन केला आणि...!

शार्दूलने पुढे सांगितलं की, ज्यावेळी मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होतो तेव्हा झहीर खानने मला फोन केला. यावेळी झहीरने मला सांगितलं की, तुला संभाव्य बदली म्हणून बोलावण्यात जाऊ शकतं जाऊ शकतं. जर तुला बदली म्हणून बोलावलं गेलं तर तुला पुन्हा सुरुवात करावी लागेल."

मी संधी घेणं पसंत केलं

चढ-उतार हे आयुष्याचा एक भाग आहेत. मी नेहमीच माझ्या कौशल्यांचे समर्थन केलंय. काही स्विंग आणि मी आधी जे पाहिले आहे त्यावरून, हेड आणि अभिषेक यांना त्यांचे चान्स घेणं आवडतं. म्हणून मी विचार केला की मी देखील माझा चान्स घेईन. नवीन चेंडू असा आहे जिथे जर तो स्विंग झाला तर तुम्ही विकेट घेऊ शकता आणि मी माझे चान्स घेतले. अशा सामन्यांमध्ये गोलंदाजांना खूप कमी मिळतात. अगदी शेवटच्या सामन्यातही मी म्हटलं होतं की, पीच अशा प्रकारे तयार केल्लं पाहिजे की खेळ संतुलित राहील, असंही यावेळी शार्दूलने म्हटलंय.

'लॉर्ड' शार्दूलची कामगिरी

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात शादूर्लने उत्तम कामगिरी केली. यावेळी शार्दूलने ४ ओव्हर्समध्ये ३४ रन्स देत ४ विकेट्स काढले. शार्दुल ठाकूरने सुरुवातीला हैदराबादला दोन धक्के दिले. त्याने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अभिषेक शर्मा आणि दुसऱ्या बॉलवर इशान किशनची विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT