rohit sharma and virat kohli  saam tv
Sports

Rohit Sharma: ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा बद्दल फारशा माहित नसलेल्या ५ गोष्टी

Rohit Sharma Birthday Special: या खास दिवशी जाणून घ्या रोहितबद्दल न माहीत असलेल्या काही गोष्टी.

Ankush Dhavre

Rohit Sharma Facts: मैदान कुठलंही असो गोलंदाजाने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला तर तो मैदानाबाहेरच जाणार. वनडे सामन्यात शतक पूर्ण केलं की द्विशतक देखील झळकावणार. अशी धमक ठेवणारा फलंदाज म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा.

हिटमॅन नावाने प्रसिध्द असलेला रोहित आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. रोहित बद्दल अनेक गोष्टी तुम्हाला माहित असतील. मात्र काही अशा गोष्टी देखील आहेत ज्या खूप कमी लोकांना माहीत आहेत. या खास दिवशी जाणून घ्या रोहितबद्दल न माहीत असलेल्या काही गोष्टी.

आजी - आजोबांसोबत राहायचा हिटमॅन

मुंबईकर रोहित शर्मा हा आपल्या आजी - आजोबांसह बोरीवलीत राहायचा. त्याचे आई - वडील बोरिवली पासून काही तासांवर असलेल्या डोंबिवलीत राहायचे. त्यावेळी ते वन बीएचके फ्लॅटमध्ये राहायचे. घर मोठं नसल्याने रोहितला बोरीवलीत शिफ्ट व्हावं लागलं होतं.

रितिका - सोहेल खान कनेक्शन

रोहितची पत्नी रितिका सजदेह ही प्रसिद्ध स्पोर्ट्स मॅनेजमेंट फर्मचे मालक बंटी सचदेवा यांची चुलत बहीण आहे. तसेच बंटी सचदेवा हा सोहेल खानची पत्नी सीमा सचदेवाचा भाऊ आहे. (Latest sports updates)

वनडेत सर्वात मोठी खेळी..

वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्माने २०१४ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २६४ धावांची खेळी केली होती. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली होती. २०१३ मध्ये देखील ऑस्ट्रेलिया विरुध्द फलंदाजी करताना दुहेरी शतक झळकावले होते. त्याने वनडे कारकिर्दीत एकूण ३ दुहेरी शतके झळकावली आहेत. (Unknown Things About Rohit Sharma)

रोहित शर्मा शाकाहारी आहेत. तरीदेखील त्याला अंडी खायला खूप आवडतं. मात्र तो घरात अंडी खात नाही. ज्यावेळी तो बाहेर त्यावेळी तो अंडी खातो. तो आपल्या परंपरेचा आदर करतो. एकदा रोहित शर्माने त्याच्या मित्राला न थांबता ५० अंडी खाण्याचं चॅलेंज दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT