Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय, रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये विक्रमी ३ दुहेरी शतके झळकावली आहेत. असा कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीमुळे त्याची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. फॅन्सला आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं. दरम्यान रोहित शर्मा ४५ नंबरची जर्सी का घालतो? यामागचं कारण आता समोर आलं आहे.
तुम्ही जर रोहित शर्माचे फॅन असाल तर तुम्हाला चांगल्याने माहित असेल की, रोहित शर्मा ४५ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. मात्र यामागचं कारण काय? हे खुप कमी लोकांना माहित आहे.
एखादा खेळाडू ज्यावेळी आपल्या जर्सी नंबरची निवड करतो, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. रोहित शर्माने देखील ४५ नंबर निवडण्यामागे हटके कारण आहे. (Secret Behind Rohit Sharma 45 jersey number)
एका मुलाखतीत रोहित शर्माला ४५ नंबरची जर्सी घालण्यामागे काय कारण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने खुलासा करत म्हटले होते की,'यामागे असं काही खास कारण नाहीये. मला अजूनही आठवतं, आम्ही श्रीलंकेत होतो. अंडर -१९ वर्ल्ड कप सुरु होता. सामना टीव्ही वर लाईव्ह दाखवण्यात येणार होता. तोपर्यंत आमच्या जर्सीवर नंबर नव्हता.' (Latest sports updates)
भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमी फायनलचा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना जर्सी नंबरची निवड करण्यास सांगितले होते. त्यावेळी रोहित शर्माला १९ नंबरची जर्सी हवी होती. मात्र आधीच कोणीतरी १९ नंबरच्या जर्सीची निवड केली होती. त्यावेळी रोहितने आपल्या आईला कॉल केला आणि कोणता जर्सी नंबर घेऊ असं विचारलं. त्यावेळी त्याच्या आईने ४५ नंबर सुचवला होता.
रोहित शर्माची कारकीर्द
रोहित शर्मा हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने वनडे क्रिकेटमध्ये ३ वेळेस दुहेरी शतक झळकावले आहे. तसेच त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २४३ वनडे सामन्यांमध्ये ४८.६४ च्या सरासरीने ९८२५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३० शतके तर ४८ अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान २६४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.