Viral poster Instagram
Sports

IPL Viral Video: बेरोजगार तरुणाची मुलींच्या पालकांकडे खास मागणी! स्टेडियमधील ‘तो’ Video व्हायरल

Viral Video: एक बोर्ड सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरतोय.

Ankush Dhavre

IPL Funny Posters: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये जाऊन गर्दी करताना दिसून येत आहेत.

स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक आपल्या आवडत्या संघाला समर्थन करणारे पोस्टर घेऊन येतात. तसेच काही प्रेक्षक आगळी वेगळी मागणी करणारे पोस्टर देखील घेऊन येत असतात.

जे कॅमेरासमोर येताच चर्चेचा विषय ठरतात. असाच एक बोर्ड सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरतोय.

पोस्टर घेऊन तरुणाने केले आव्हान..

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुण आगळी वेगळी मागणी करणारा बोर्ड घेऊन मैदानात पोहोचला आहे. तो हातात हा बोर्ड घेऊन स्टेडियमच्या सीटवर उभा असल्याचे दिसून येत आहे.

त्या पोस्टरवर मोठ्या शब्दात लिहिले आहे की, 'लग्नासाठी सरकारी नौकरी असलेला नवरा शोधणे बंद करा, बेरोजगारी...' या पोस्टरवर कॅमेरामनची नजर पडली आणि तो तरुण आपल्या पोस्टरसह मोठ्या स्क्रीनवर झळकला. या पोस्टरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस..

व्हायरल होत असलेला व्हिडिओ lucknowi_nazaare या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अपलोड होताच जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ७ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या भावाने केलेली पोस्ट अनेकांना पटली आहे. अनेकांनी कमेंट करत त्याला समर्थन केले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'आताची तरुणाई सुरु असलेले मुद्दे थेट स्टेडियममध्ये घेऊन जात आहे.' तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'भावाला पूर्ण पाठिंबा द्या.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यात गोळी घातली, गाडीतून बाहेर फेकलं अन्...., पुण्यातील हत्याकांडाचा भयानक CCTV समोर

Political News : बदलापूरमध्ये शिंदेंचा भाजपाला दे धक्का! बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

Bihar Election Result: लाडक्या बहिणींमुळे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार? नेमका गेम कुठे फिरला?

Heart cancer: होय, हृदयाचा कॅन्सरही होऊ शकतो; कोणाला असतो जास्त धोका? वाचा

SCROLL FOR NEXT