u 19 world cup india vs south africa
u 19 world cup india vs south africa  saam tv
क्रीडा | IPL

U-19 World Cup: यश धुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा आफ्रिकेवर ४५ धावांनी विजय

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : विराट काेहलीच्या (virat kohli) संघावर दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवून काही तास उलटले नाही ताेच दूसरीकडे भारतीय युवा खेळाडूंनी १९ वर्षाखालील गटात दक्षिण आफ्रिका संघास ४५ धावांनी हरवून हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिले आहे.

१९ वर्षाखालील गटातील विश्व करंडक स्पर्धेत भारताची ब गटात उत्तम सुरुवात झाली आहे. भारतीय (india) संघाने दक्षिण आफ्रिकेचा (south africa) पराभव केला आहे. २३३ धावांचे उद्दीष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघास हा पल्ला गाठता आला नाही. (under 19 world cup yash dhull gives india winning start south africa lost)

दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली झाली हाेती. ११ षटकांत केवळ एका गडाच्या मोबदल्यात संघाच्या ५५ धावा झाल्या होत्या. डेवाल्ड ब्रेव्हिस उत्तम फलंदाजी करत असतानाही मधल्या षटकांमध्ये खेळपट्टीवर हाेत असलेल्या फिरकीचा भारतीय संघास फायदा झाला.

भारताच्या विकी ओस्तवाल, निशांत सिंधू आणि कौशल तांबे यांच्या गाेलंदाजी पुढं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही. दक्षिण आफ्रिका संघ दडपणाखाली गेला. त्याचा फायदा भारतीय संघाने उठवत ४९ धावांत शेवटचे सात गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा डाव १८७ धावांत आटोपला.

दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार यश धुलच्या (Yash Dhull) ८२ धावांच्या खेळीमुळे भारताने २३२ धावांपर्यंत मजल मारली हाेती. यामध्ये कौशल तांबेने ४४ चेंडूंत ३५ धावा केल्या हाेत्या.

संक्षिप्त धावसंख्या: भारत ४६.४ षटकांत २३२ (शैक रशीद ३१, यश धुल ८२, कौशल तांबे ३५; मॅथ्यू बोस्ट ३-४०, ऍफिवे मन्यांदा २-२९, डेवाल्ड ब्रेव्हिस २-४३) दक्षिण आफ्रिका ४५.५ षटकांत सर्व बाद १८७. ब्रेव्हिस ६५, जॉर्ज व्हॅन हिर्डन ३६; राज बावा ४-४७, विकी ओस्तवाल ५-२८.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

SCROLL FOR NEXT