IND U19 vs PAK U19: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आयसीसी अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील सामना पार पडला. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव २३८ धावांवर आटोपला.
भारताला हा सामना जिंकण्यासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना, भारतीय संघाकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानावर आली. मात्र या जोडीला अवघ्या २८ धावा जोडत्या आल्या.
आधी आयुष म्हात्रे (२०) त्यानंतर वैभव सूर्यवंशी (१) स्वस्तात बाद होऊन माघारी परतले. त्यानंतर आंद्रे सिद्धार्थ (१५) तर कर्णधार मोहम्मद अमान (१६) धावांवर माघारी परतला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या निखिल कुमारने संघाचा डाव सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने या डावात (६७) धावांची खेळी केली.
मात्र त्याला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघाला दिलेलं आव्हान गाठता आलं नाही. शेवटी धावांचा पाठलाग करताना मोहम्मद एनामने ३० आणि युद्धजीत गुहाने १३ धावा केल्या. दोघांनी मिळून ४८ धावांची भागीदारी केली. मात्र भारतीय संघाला पराभव टाळता आलेला नाही.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, पाकिस्तानच्या सलामी जोडीने मिळून १६० धावा जोडल्या. सलामीला फलंदाजी करताना उस्मान खानने ६० धावांची खेळी केली.
तर शेहजाब खानने १५९ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर मोहम्मद रियाजने २७ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २८१ पर्यंत पोहोचवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.