Umpire Salary: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगातील दिग्गज खेळाडू सहभाग घेत असतात. त्यामुळे युवा खेळाडूंना दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत असते. या लीगमध्ये पैशांचा पाऊस पाडला जात असतो.
लिलावात फ्रँचायजी कोट्यवधींची बोली लावून खेळाडूंना आपल्या संघात स्थान देत असतात. आयपीएल स्पर्धेत अंपायरिंग करणाऱ्या अंपायरला किती मानधन दिले जाते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडलाच असेल. चला तर मग जाणून घ्या.
आयपीएलच्या एका हंगामात नवखे खेळाडू लाखो रुपये तर अनुभवी खेळाडू कोट्यवधी रुपयांची कमाई करत असतात. तसेच कमाईच्या बाबतीत अंपायर देखील मागे नाहीये. आयपीएल स्पर्धेत अंपायरचे मानधन हे दोन गटात विभागले गेले आहे. पहिला गट म्हणजे जे अंपायर आयसीसीच्या पॅनलमध्ये आहेत.
या गटात असणाऱ्या अंपायरला प्रत्येक सामन्यात अंपायरिंग करण्यासाठी १.९८ लाख रुपये दिले जातात. तर दुसरा गट म्हणजे डेव्हलपमेंट अंपायर. या गटात असणाऱ्या अंपायरला प्रत्येक सामन्यात अंपायरिंग करण्यासाठी ५९ हजार रुपये दिले जातात. (Latest sports updates)
आयपीएल स्पर्धेत अंपायर देखील लाखो रुपयांची कमाई करतात. कारण एका अंपायरला एका हंगामात कमीत कमी २० सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याची संधी मिळते. याचा अर्थ असा की, एक अंपायर एका हंगामात कमीत कमी ४० लाख रुपयांची कमाई करतात. इतकंच नव्हे तर तुम्ही अंपायरकडे जर नीट पाहिलं तर त्यांच्या टी शर्टवर लोगो असतो.
त्या लोगोचे देखील त्यांना पैसे दिले जातात. लोगो लावण्याचे त्यांना एका हंगामात जवळपास ७.५० लाख रुपये दिले जातात. यावेळी ७४ सामने खेळवले जाणार आहेत. त्यामळे या हंगामात अंपायर खेळाडूंपेक्षाही अधिकची कमाई करू शकतात. अजिंक्य रहाणेवर आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी ५० लाखांची तर रिंकू सिंगवर ५५ लाखांची बोली लावण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.