U19 World Cup 2024 Saam tv
क्रीडा

U19 World Cup 2024: अंडर १९ विश्वचषकात भारताचा करिष्मा, २१४ धावांच्या फरकाने न्यूझीलंडला धूळ चारली

U19 World Cup 2024 India vs New Zealand: आयसीसीने आयोजित केलेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचा सुपर ६ फेरी सुरु झाली आहे. सुपर ६ फेरीच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला २१४ धावांच्या फरकाने धूळ चारली आहे.

Vishal Gangurde

India vs New Zealand:

अंडर १९ विश्वचषक स्पर्धेतील सलग चौथ्या सामन्यात भारताचा करिष्मा पाहायला मिळत आहे. आयसीसीने आयोजित केलेल्या अंडर-१९ विश्वचषकाची सुपर ६ फेरी सुरु झाली आहे. सुपर ६ फेरीच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला २१४ धावांच्या फरकाने धूळ चारली आहे. न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने विश्वचषक जिंकण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. (Latest Marathi News)

न्यूझीलंडच्या फलंदाजांची पडझड

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने दिलेल्या २९६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडचा संघ अवघ्या ८१ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने सर्वाधिक १९ धावा केल्या. तर जॅक कमिंगने १६ धावा केल्या. जेम्सने १० धावा ठोकल्या. न्यूझीलंडचे ६ खेळाडू दहाचा आकडाही गाठू शकले नाहीत. भारतासाठी सौम्या पांडेने सर्वाधिक गडी बाद केले.

टीम इंडियाची दमदार फलंदाजी

टीम इंडियासाठी राज लिबांनी आणि मुशीर खानने दोन-दोन गडी बाद केले आहे. तर फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी जलवा दाखवला. टीम इंडियाने ५० षटकात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी २९६ धावांचा आव्हान दिलं होतं. भारताने नाणेफेक हरल्यानंतर ५० षटकात ८ गडी गमावून २९५ धावा केल्या होत्या. या डावात मुशीर खानने दमदार शतकी खेळी खेळली.

मुशीरचं दमदार शतक

मुशीरने १२६ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकाराच्या जोरावर १३१ धावा ठोकल्या. तर सलामीवर आदर्श सिंहने ५२ धावा ठोकल्या. कर्णधार उदय सहारनने ३४ धावा ठोकल्या. अरवेल्ली अविनाशने १७ , सचिन दासने १५ धावांचं योगदान दिलं. अर्शिन कुलकर्णीने ९ धावा केल्या. तर न्यूझीलंडसाठी मेसन क्लार्कने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT