Team india Under 19 World Cup X BCCI
क्रीडा

U19 World Cup : अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजयाचा श्रीगणेशा; बांगलादेशचा ८४ धावांनी पराभव

India vs Bangladesh : ब्लोमफॉन्टेन येथील मॅंगॉंग ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारतीय अंडर- १९ संघाने बांगलादेशचा ८४ धावांनी पराभव केला.

Bharat Jadhav

India vs Bangladesh Under 19 World Cup:

भारताने अंडर-१९ वर्ल्डकप २०२४ ची सुरुवात विजयाने केलीय. ब्लोमफॉन्टेन येथील मॅंगॉंग ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारतीय अंडर- १९ संघाने बांगलादेशचा ८४ धावांनी पराभव केला. बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा केल्या. त्यानंतर भारताने दिलेले आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगला देशाच्या संघाने १६७ धावांमध्ये आपला दम तोडला. बांगलादेशाच्या संघाने ४५.५ षटकात १६७ धावा केल्या. भारताचा गोलंदाज सौम्य पांडे याने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. (Latest News)

दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची (Bangladesh) सुरुवात चांगली झाली होती, पण पॉवरप्लेमध्येच संघाने तीन गडी गमावले. बांगलादेशची पहिली विकेट सातव्या षटकात पडली. आलम १४ धावा करून बाद झाला. यानंतर सौम्य पांडेने रिझवान (०) आणि रेहमान (१४ ) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर अहरारला १५ चेंडूत फक्त ५ धावा करता आल्या. आरिफुलने ७१ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली. रहमानने ४ धावा केल्या. जेम्स ५४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकात अर्शीन कुलकर्णीची (७) विकेट संघाने गमावली. आठव्या षटकात भारताची दुसरी विकेट पडली. मुशीर खानला केवळ ३ धावा करता आल्या. सलामीवीर आदर्शने कर्णधार उदय सहारनसोबत शतकी भागीदारी केली. आदर्श ९६ चेंडूत ७६ धावा केल्या. कर्णधार उदय सहारनने ९४ चेंडूत ६४ धावा करत माघारी परतला. अविनाशने १७ चेंडूत २३ तर प्रियांशू मोलियाने ४२ चेंडूत २३ धावा केल्या.

आदर्श आणि कर्णधार उदयने दमदार खेळी केली. आदर्शने ९६ चेंडूमध्ये ७६ धावा केल्या. तर कर्णधार उदयने ९४चेंडूत ६४ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २३.५ षटकांत ११६ धावांची भागीदारी केली. मात्र, बांगलादेशच्या फिरकीपटूंसमोर हे दोन्ही फलंदाज चांगला खेळ करण्यास अपयशी ठरले.

ऑफस्पिनर शेख पावेझ जिबोनने १० षटकांत ३९ धावा) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज महफुझूर रहमान रब्बी ( १० षटकांत ४१ धावांत १ बळी घेतला. बांगलादेशच्या दोन्ही फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून ठेवलं. आदर्शने या डावात ६ चौकार मारले, तर उदयला केवळ ४ चौकार मारता आले. भारतीय फलंदाजांनी ५० षटकांत केवळ १४ चौकार आणि २षटकार मारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अणुशक्ती नगर मधून सना मलिक पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT