Rinku Singh: रिंकू सिंगला लॉटरी लागली! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात निवड

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी रिंकू सिंगची भारतीय अ संघात निवड झाली आहे.
Rinku singh
Rinku singhsaam tv news
Published On

Rinku Singh Latest News:

डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंगने कमी वेळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये फिनिशर म्हणून अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.

नुकताच अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याची बॅट चांगलीच तळपली. शेवटच्या टी-२० सामन्यात त्याने रोहित शर्मासोबत मिळून १९० धावांची विक्रमी भागीदारी केली. त्याच्या या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने त्याला मोठी संधी दिली आहे.

भारत- इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका सुरु आहे. २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या सामन्याचा थरार रंगणार आहे. तर १ फेब्रुवारीपासून तिसऱ्या सामन्याला प्रारंभ होणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी रिंकू सिंगलाही स्थान देण्यात आलं आहे. त्याला सरफराज खानच्या जागी संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंगसह अर्शदीप सिंगलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे. (Latest sports updates)

Rinku singh
IND vs ENG: टीम इंडियाचा हा स्टार फलंदाज ठरणार गेम चेंजर! रेकॉर्ड पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांचा थरकापच उडेल

दुसऱ्या सामन्यासाठी असा आहे भारतीय अ संघ:

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, टिळक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल.

Rinku singh
Team India: टीम इंडियासाठी ८५ कसोटी सामने खेळणारा हा फलंदाज लवकरच निवृत्ती घेणार? संघात कमबॅक करणं कठीण

तिसऱ्या सामन्यासाठी असा आहे भारतीय अ संघ:

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, टिळक वर्मा, रिंकू सिंग, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, शम्स मुलानी, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com