Women U19 WC Ind Vs England  Women U19 WC Ind Vs England
क्रीडा

U19 T20 WC 2023: वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार शेफाली शर्माचं धोनी आणि आफ्रिका कनेक्शन, असा रचला इतिहास

पुरुषांचा T20 विश्वचषक पहिल्यांदा 2007 मध्ये खेळला गेला. योगायोग असा की 2007 चा T20 विश्वचषक देखील दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता.

साम टिव्ही ब्युरो

U19 T20 WC 2023: टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. रविवारी अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. अंतिम सामना जिंकण्यासोबतच शेफाली वर्मासाठी देखील हा विश्वचषक खास ठरला आहे.

पहिलाच अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारताने आपल्या नावे केला. शेफाली वर्मा ही स्पर्धा जिंकणारी पहिली कर्णधार ठरली आहे. (U19 World Cup)

शेफाली वर्माने आपल्या नेतृत्वात तशीच कामगिरी केली जी महेंद्रसिंह धोनीने 16 वर्षांपूर्वी केली होती. पुरुषांचा T20 विश्वचषक पहिल्यांदा 2007 मध्ये खेळला गेला. योगायोग असा की 2007 चा T20 विश्वचषक देखील दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता.

आफ्रिकेच्या भूमितच धोनीने आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. महिला अंडर 19 टी 20 विश्वचषकाचे आयोजन देखील दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं आणि इथेही भारतानेच बाजी मारली. (Women Cricket)

धोनी-शेफाली ठरले चॅम्पियन

शेफाली वर्माने देखील तशीच कामगिरी केली जी धोनीने 2007 साली केली होती. एमएस धोनीने 2007 टी-20 विश्वचषकाद्वारे प्रथमच आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आणि संघाला चॅम्पियन बनवले.

धोनीच्या संघातही युवा खेळाडूंचा भरणा होता. तर शेफालीच्या संघातील सर्व खेळाडू नवखेच आहेत. 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताने फक्त एकच सामना गमावला होता. अंडर-19 T20 विश्वचषकातही भारत फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT