U-19 T20 World Cup: Team India च्या मुलींनी रचला इतिहास! फायनलमध्ये इंग्लडचा धुरळा; विश्वचषकावर कोरले नाव

भारत आणि इंग्लड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लडला धूळ चारत भारतीय खेळाडूंनी १९ वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरण्याचा पराक्रम केला आहे...
U19 World Cup
U19 World CupSaamtv
Published On

U-19 T20 World Cup: आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी आणि संपुर्ण देशवासियांनी महत्वाचा ठरला.  १९ वर्षाखाली महिला विश्वचषकावर भारतीय खेळाडूंनी नाव कोरले आहे. इंग्लडविरुद्ध झालेल्या या अंतिम भारतीय महिला खेळाडूंनी इंग्लडला धूळ चारत हा पराक्रम केला.

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त खेळी केली. (U19 World Cup)

U19 World Cup
U-19 T20 World Cup- गोलंदाजीत पोरींची कमाल, इंग्डलची दाणादाण, विजयासाठी ठेवले अवघे ६९ धावांचे आव्हान

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या इंग्लंडची फायनलमध्ये घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. भारतीय खेळाडूंच्या गोलंदाजीपुढे इंग्लडची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.

इंग्लंडचा संपूर्ण संघ 17.1 षटकांत 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्याचवेळी सोफिया स्मेल आणि अलेक्स स्टेनहाऊसच्या बॅटमधून 11-11 धावा झाल्या.

U19 World Cup
U-19 T20 World Cup: लेकीचा खेळ पाहण्यासाठी खरेदी केला इन्व्हर्टर! झोपडीत राहणारी खेळाडू गाजवणार विश्वचषक...

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघालाही कर्णधार शेफाली वर्माच्या रुपाने पहिला झटका बसला. शेफाली अवघ्या १५ धावा करुन तंबूत परतली. तिच्यापाठोपाठ श्वेता सेहरावतनेही आपली विकेट गमावली. मात्र त्यानंतर आलेल्या सौम्या तिवारी आणि त्रिशाने भारताचा डाव सावरला, आणि संघाला विजय मिळवून दिला.

गोलंदाजांची कमाल...

संधूने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हीपला ( ०) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्चना देवीने इंग्लंडच्या निआम्ह हॉलंडचा ( १०) त्रिफळा उडवला. भारताकडून टी. साधू, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (Women Cricket)

सर्वात निच्चांकी धावसंख्या...

ICC स्पर्धेच्या फायनलमधील सर्वबाद ६८ ही सर्वात निचांक खेळी ठरली. यापूर्वी २००६मध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने ७१ धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघालाही २० धावांत दोन धक्के बसले. कर्णधार शेफाली वर्मा १५ धावांवर, तर श्वेता सेहरावत ५ धावांवर बाद झाल्या.

सौम्या तिवारी आणि गोंगडी त्रिशा ( २४) या जोडीने भारताचा डाव सावरला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com