Archana Devi Saamtv
Sports

U-19 T20 World Cup: लेकीचा खेळ पाहण्यासाठी खरेदी केला इन्व्हर्टर! झोपडीत राहणारी खेळाडू गाजवणार विश्वचषक...

अगदी लहान वयात वडिलांना गमावल्यानंतर तिच्या धाकट्या भावाचा सहा वर्षांपूर्वी सर्पदंशानं मृत्यू झाला,

Gangappa Pujari

Ind Vs Eng U-19 T20 World Cup -  आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी आणि संपुर्ण देशवासियांनी महत्वाचा दिवस आहे. कारण १९ वर्षाखाली महिला विश्वचषकाच्या फायनलचा थरार आज रंगणार आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघाची लढत इंग्लडविरुद्ध असणार आहे. कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लड संघाला धूळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे..

पण त्या आधी जाणून घेवूया अशा खेळाडूची कहाणी जिने मोठा संघर्ष करत टीम इंडियाच्या संघात स्थान मिळवले आहे, जी आज विश्वचषकाचे मैदान गाजवेल. (T20 World Cup)

भारतीय महिला संघातील ही खेळाडू आहे अर्चना देवी. ती उत्तर प्रदेशातील कानपूरची आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून अर्चनाने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. अगदी लहान वयात वडिलांना गमावल्यानंतर तिच्या धाकट्या भावाचा सहा वर्षांपूर्वी सर्पदंशानं मृत्यू झाला. याच वर्षी अर्चना पहिल्यांदा मैदानात उतरली होती. पुरुष संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवचे प्रशिक्षक पूनम गुप्ता आणि कपिल पांडे यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

आईने खरेदी केला इन्हरर्टर...

अर्चनाच्या रताई पूर्वा गावात 400 लोक राहतात. गावात विजेची समस्या यामुळेच मुलीचा खेळ पाहण्यासाठी अर्चनाच्या आई सावित्रीदेवींनी पैसे वाचवून वाचवून इन्व्हर्टर खरेदी केला आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अर्चनाची आई सावित्री देवी सांगतात, 'आमच्या गावी विजेची समस्या आहे, त्यामुळं मी इन्व्हर्टर घेण्यासाठी पैसे वाचवले आहेत. माझी मुलगी देशासाठी वर्ल्ड कपची फायनल खेळत आहे. याचा मला खूप अभिमान आहे.' तसेच स्पर्धेपुर्वी अर्चनाने आपल्या आईसाठी एक फोनही भेट म्हणून दिला आहे. (Indian Cricket Team)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT