Ashes 2023: अॅशेस 2023 मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत 43 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात जॉनी बेअरस्टोची विकेट चर्चेचा विषय ठरली.
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक कॅरीने बेअरस्टोला आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद केले. बेअरस्टो शॉट न खेळताच पुढे आला होता. त्यावेळी कॅरीने हिट मारत त्याला बाद केले. (Jonny Bairstow Wicket)
बेअरस्टो (Jonny Bairstow) बाद झाल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. याबाबत बोलताना अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले मत मांडले आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने याबाबत बोलताना म्हटले की, ' जर मी त्यावेळी फिल्डिंग करणारा कर्णधार असतो तर मी त्यावेळी अंपायरवर अधिक दबाव टाकला असता. मी खेळ भावनेचा विचार केला असता. जर तुम्ही मला विचाराल की, तुला असं करून जिंकायचं आहे का? तर माझं उत्तर नाही असेल.' (Jonny Bairstow Run Out)
तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने याबाबत बोलताना म्हटले की, 'मला असं वाटतं की, कॅरीने यापूर्वी देखील पाहिलं होतं. त्याने चेंडू पकडला आणि थ्रो केला. माझ्या मते हे योग्य आहे. हाच नियम आहे. काही लोक या गोष्टीला समर्थन करणार नाहीत. मात्र हाच नियम आहे.'
तर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगने या निर्णयावरून नाराजी व्यक्त करत बेअरस्टो नाबाद असल्याचे म्हटले आहे. त्याने ट्विट करत म्हटले की, ' बेअरस्टोची विकेट, नॉट आऊट..क्रिकेटच्या सीमा ओलांडल्या गेल्या. धाव घेण्याचा प्रयत्न न करणं, षटक संपलं होतं, त्यानंतर फलंदाजासोबत चर्चा करण्यासाठी जाणं.' (Latest sports updates)
पाहा प्रतिक्रिया..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.