Dream 11 Winner
Dream 11 Winner  Canva
क्रीडा | IPL

Dream 11: 49 रुपयांचा कॉन्टेस्ट अन् दीड कोटींचं बक्षीस! कुठल्या ट्रिकचा वापर करून ट्रक ड्रायव्हर झाला रातोरात करोडपती?

Ankush Dhavre

Truck Driver shahabuddin Won Dream 11 Contest: तुम्ही 'फिर हेरा फेरी' चित्रपटातील 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के..' हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. तुम्हालाही कधीतरी नक्कीच वाटलं असेल की, एकदा तरी आपली लॉटरी लागावी.

मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यात राहणाऱ्या शहाबुद्धीनचं हे स्वप्नं सत्यात उतरलं आहे. ट्रक ड्रायव्हरची नोकरी करणारा शहाबुद्धीन रातोरात कोट्याधीश झाला आहे.

शहाबुद्धीनने आयपीएल स्पर्धेतील कोलकाता विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान टीम बनवली होती. याच सामन्यात त्याने दीड कोटींची कमाई केली आहे. त्याने ४९ रुपयांच्या कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता.

या सामन्यातील त्याचा अंदाज बरोबर ठरला आणि त्याची दीड कोटींची लॉटरीच लागली. मात्र यासासाठी त्याने दोन वर्ष वाट पहिली. अखेर त्याच्या नशिबाचं नाणं खणखणलं.

ड्रीम ११ या फँटसी क्रिकेट अॅपवर त्याने आपली ११ खेळाडूंची टीम बनवली होती. या ११ ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि त्याला दीड कोटी रुपये जिंकून दिले. आता १.०५ कोटी इतकी रक्कम त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल. तर उर्वरीत ३० टक्के रक्कम ही कर स्वरूपात कापून घेतली जाईल. (Latest sports updates)

आता तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की, ज्या ११ खेळाडूंनी शहाबुद्धीनला कोट्यवधींची कमाई करून दिले ते ११ खेळाडू कोण? त्याने अर्शदीप सिंगला संघाचा कर्णधार केलं होतं. तर सिकंदर रजाला संघाचे उपकर्णधारपद दिले होते.

यासह त्याने शिखर धवन, भानुका राजपक्षे, आर गुरबाज, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सॅम करण, टीम साऊथी आणि राहुल चहर यांचा आपल्या संघात समावेश केला होता.

कोट्याधीश झाल्यानंतर काय म्हणाला शहाबुद्धीन?

इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर शहाबुद्धीन भलताच खुश झाला आहे. त्याने म्हटले की,' मी एक ड्रायव्हर आहे आणि सध्या भाडयाच्या घरात राहतोय. मिळालेल्या रकमेतून मी घर बांधणार आहे. इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आनंद झाला आहे. तसेच इतर लोकही शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

Today's Marathi News Live : हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Elon Musk: भारत भेट रद्द केल्यानंतर मस्क पोहोचले चीनमध्ये, भेटीचं कारण काय?

Siddhant Chaturvedi Birthday : बॉलिवूडच्या 'गली बॉय'चा आज वाढदिवस; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आहे कोट्यवधींचा मालक

Narendra Modi: विरोधकांवर ईडी, सीबीआयची कारवाई सुडबुद्धीने? PM मोदींनी फेटाळला आरोप; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT