Travis head out or not out Kumar Sangakkara gets angry on umpire decision amd2000 twitter
Sports

Travis Head Runout: ट्रेविस हेड आऊट की नॉटआऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयावरून संगकाराचा पारा चढला - video

Travis Head Runout Controversy: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकला आणि पाहुण्या राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून नेहमीप्रमाणे ट्रेविस हेडने वेगवान सुरुवात करून दिली. त्याने ४४ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले.

नेमकं काय घडलं?

ट्रेविस हेड फलंदाजी करत असताना आवेश खान गोलंदाजी करत होता. त्यावेळी आवेश खानने टाकलेला चेंडू हुकला आणि संजू सॅमसनच्या हातात गेला. त्यावेळी फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तितक्यात संजू सॅमसनने चेंडू अडवला आणि स्टंपकडे थ्रो केला. हा निर्णय तिसऱ्या अंपयारकडे पाठवण्यात आला. मोठ्या स्क्रीनवरही स्पष्ट दिसून येत होतं की, चेंडू स्टंपला जाऊन लागला त्यावेळी फलंदाजाची बॅट क्रिझमध्ये नव्हती. मात्र तरीही अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं.

तिसऱ्या अंपायरने घेतलेल्या या निर्णयामुळे राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील सदस्यही आश्चर्यचकित झाले. कोणाचाच विश्वास बसत नव्हता की, हेडला नॉटआऊट घोषित करण्यात आलं आहे. हे पाहून कुमार संगकारालाही राग अनावर झाला. तो थेट अंपायरशी भिडला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटक अखेर ३ गडी बाद २०१ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला २०० धावां पर्यंत मजल मारता आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT