ipl auction yandex
Sports

IPL 2025 Auction: 13 ते 42...कोण आहे IPL लिलावात नाव नोंदवणारे सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू?

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावासाठी ५७४ खेळाडू शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआयने) शूक्रवारी आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावासाठी ५७४ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. या लिलावासाठी १५७४ खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदवलं होतं.

या १५७४ खेळाडूंमध्ये २ खेळाडू असे आहेत जे तुफान चर्चेत आहेत. एक खेळाडू अवघ्या १३ वर्षांचा आहे. तर एक खेळाडू ४२ वर्षांचा आहे. मुख्य बाब म्हणजे दोघांनीही पहिल्यांदाच लिलावासाठी नाव नोंदवलं आहे.

भारताचा १३ वर्षीय खेळाडू लिलावात

या लिलावासाठी बिहारचा १३ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीनेही नाव नोंदवलं आहे. लिलावाच्या यादीत तो ४९१ व्या स्थानी आहे. त्याचा ६८ व्या सेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये भारतीय अंडर १९ आणि ऑस्ट्रेलिया अंडर १९ यांच्यात झालेल्या यूथ कसोटी मालिकेत या युवा फलंदाजाने शानदार फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

या मालिकेमुळे तो चर्चेत आला. मात्र त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचा रेकॉर्ड पाहिला, तर ५ सामन्यातील १० डावात त्याला अवघ्या १०० धावा करता आल्या आहेत. यादरम्यान ४१ धावा ही त्याची सर्वात्तम खेळी आहे.

जेम्स अँडरसननेही नोंदवलं नाव

आयपीएल २०२५ स्पर्धेतील लिलावासाठी इंग्लंडचा माजी खेळाडू जेम्स अँडरसननेही नाव नोंदवलं आहे. तो या लिलावासाठी नाव नोंदवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९९१ गडी बाद करणाऱ्या जेम्स अँडरसनने २०१४ मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. आता वयाच्या ४२ व्या वर्षी त्याने लिलावासाठी नाव नोंदवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Export: बांगलादेशात पाकिस्तानाचा कांदा; भारतीय शेतकऱ्यांचा वांदा,केंद्र सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांना पुन्हा रडवलं

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT