IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

India vs South Africa 3rd T20I: भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजी करताना रेकॉर्डब्रेकिंग टोटल केली आहे.
IND vs SA:पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर
SANJU SAMSONTWITTER
Published On

India vs South Africa 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर सुरु आहे. या डावात भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पळून पळून मारलं. २० षटकअखेर भारताने रेकॉर्डब्रेक २८३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८४ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे.

मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ सलग चौथ्यांदा फलंदाजीला आला. भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी मैदानात उतरली. दोघांनी पहिल्या षटकापासून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं.. पावरप्लेमध्येच दोघांनी संघाची धावसंख्या ७० धावांवर पोहोचवली. ७३ धावांवर भारतीय संघाला पहिला धक्का बसला. अभिषेक शर्मा माघारी परतला.

IND vs SA:पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर
IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

सॅमसन- तिलकची रेकॉर्डब्रेक भागीदारी

अभिषेक शर्मा बाद झाल्यनंतर तिलक वर्मा फलंदाजीला आला. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या तिलक वर्माने या डावात शांत सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी केली. संजूने ५१ चेंडूंचा सामना करत आपल्या टी-२० कारकिर्दीतील तिसरे शतक झळाकावले. तर तिलक वर्माने ४१ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तिलक वर्मा आणि संजूने मिळून नाबाद २१० धावांची भागीदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com