IND vs PAK saam tv
Sports

IND vs PAK: दुबईच्या मैदानावर टॉस ठरणार बॉस; जर 'असं' घडलं तर पाकिस्तानविरूद्ध भारताचा विजय निश्चित

Champions Trophy 2025 IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. जर सर्व काही भारताच्या बाजूने राहिलं तर मात्र आजच्या सामन्यात पाकिस्तानला जिंकणं कठीण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पाचवा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानसोबतचा शेवटचा सामना सुमारे आठ महिन्यांपूर्वी झाला होता.

२०२४ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले होते. आता ती चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी दुबईतील मैदानावर असणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. जर सर्व काही भारताच्या बाजूने गेलं तर मात्र आजच्या सामन्यात पाकिस्तानला जिंकणं कठीण होणार आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दुबईमध्ये दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे. आजच्या दिवशी दुबममध्ये ऊन असणार आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर दव पडल्यास गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत टॉसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. टॉस जिंकणारी टीम प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

कसा होऊ शकतो भारताचा विजय?

भारत-पाकिस्तान सामन्यात टॉसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. जर टीम इंडियाने टॉस जिंकली तर ते प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात येऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नेहमी सज्ज असते. भारताकडे घातक गोलंदाजी देखील आहे. जर गोलंदाजांनी त्यांची जादू दाखवली तर पाकिस्तानला रन्स करणं कठीण होऊ शकतं. यानंतर, जर फलंदाजांनी त्यांचं काम चांगलं केलं तर भारत जिंकू शकतो.

गेमचेंजर ठरणार 'हे' खेळाडू

भारताने आपला शेवटचा सामना दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. तो एक कमी स्कोर असलेला सामना होता. पण शुभमन गिलने शानदार कामगिरी करत शतक झळकावलं होतं. भारताने हा सामना जिंकला होता. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात गिलसोबत श्रेयस अय्यरकडेही चाहत्यांचं लक्ष असणार आहे. हे दोन खेळाडू टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतात. यासोबतच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज

Pune : सुप्रिया सुळेंना जोरदार धक्का, निकटवर्तीयाने घेतलं कमळ; पुण्यातील 'या' २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश

Sweater Cleaning : स्वेटरवरील मळकट डाग होतील गायब; 'या' सोप्या टिप्सने वापरून कपडे दिसतील नव्यासारखे

Railway Ticket : रेल्वे प्रवासावेळी मोबाइलमधील तिकीट चालेल की नाही? रेल्वेने एका झटक्यात स्पष्ट केले, वाचा सविस्तर

Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection : 'अवतार'च्या रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ची हवा, रणवीरच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?

SCROLL FOR NEXT