IND vs PAK Live Streaming : भारत-पाकिस्तान सामना फुकटात कुठे पाहाल?

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार असून या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता होईल.
Champions Trophy 2025
Champions Trophy 2025
Published On

भारतविरुद्ध पाकिस्तानचा चॅम्पियन्स टॉफी २०२५ चा सामना दुबई येथे आज होणार आहे. भारत आणि पाकिस्तान २०१७ मध्ये या स्पर्धेत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इच्छेने मैदानात उतरेल. भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स टॉफीत आतापर्यंत ५ वेळा आमनेसामने आलेत.

यात भारताला दोनदा विजय मिळालाय. तर पाकिस्तानने तीनदा सामना आपल्या नावावर केलाय. जर आपण दोन्ही संघामधील लढतीचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आत्ताच्या घडीला दोन्ही संघाची स्थिती पाहिली तर भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत मजबूत दिसत आहे.चॅम्पियन्स टॉफीची सुरुवात भारतीय संघासाठी शानदार राहिलीय. टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत या स्पर्धेत विजयाचा श्रीगणेशा केला.

Champions Trophy 2025
Champions Trophy: पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडणार? IND vs BAN सामन्यानंतर कसं आहे पॉईंट्स टेबल?

तर पाकिस्तान संघाची सुरुवात या स्पर्धेत खराब राहिलीय. पाकिस्तानचा सामना न्युझीलंडसोबत झाला होता. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडलाय. जमानमुळे भारताला २०१७ मध्ये पराभव पत्कारावा लागला होता. फखर जमानने भारताविरुद्ध फलंदाजी करताना शतकीय खेळी केली होती, त्याच्या या खेळीमुळे भारताचा पराभव झाला होता.

Champions Trophy 2025
Champions Trophy : पाकिस्तानकडून ब्लंडर! ऑस्ट्रेलिया-इंग्लंडदरम्यान वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, VIDEO

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा सामना २.३० वाजता सुरू होईल. या दोन्ही देशातील क्रिकेट सामना स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहू शकतात. जर तुम्हाला हा रंगतदार सामना ऑनलाईन पाहायचा असेल तर तुम्ही Jio Hotstarवर मोफत सामना पाहू शकतात. BCCI ने ऑनलाइन क्रिकेट सामन्याचं प्रेक्षपणाचे अधिकार Hotstar ला देण्यात आलेत. हे आता Jio Hotstar म्हणून ओळखले जाते.

येथे तुम्ही फुकटात हा सामना पाहू शकतात. Jio 899 प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत JioHotstar मोबाइल सबस्क्रिप्शन प्लॅन 90 दिवसांसाठी डेटा, व्हॉइस कॉलिंगसह दिला जातो. हा प्लान 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. युझर्सला कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळणार आहे. याशिवाय दररोज 2GB डेटाही मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com