top 5 batsmans to watch out in ipl 2024 virat kohli yashasvi jaiswal shubman gill suryakumar yadav faf du plessis  yandex
क्रीडा

IPL 2024: आयपीएल स्पर्धेत या ५ फलंदाजांवर असतील सर्वांच्या नजरा; गाजवू शकतात मैदान

TOP 5 Batsmans To Watch Out: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

Top 5 Batsmans To Watch Out In IPL 2024:

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही स्पर्धा सर्वांसाठीच अतिशय महत्वाची असणार आहे.

या स्पर्धेत दमदार कामगिरी करुन भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत गोलंदाज विकेट्सची रांग आणि फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतात. दरम्यन जाणून घ्या असे ५ फलंदाज जे या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडू शकतात.

विराट कोहली

विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील प्रमुख फलंदाज आहे. यावेळी देखील तो प्रमुख फलंदाजाच्या भूमिकेत असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अजून एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळे आगामी हंगामात शानदार कामगिरी करुन तो संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. गेल्या हंगामातीली १४ सामन्यांमध्ये त्याने ५३.२५ च्या सरासरीने ६३९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतक आणि ६ अर्धशतकं झळकावली होती.

शुभमन गिल..

शुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. गेल्या हंगामात गुजरातने फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये गुजरातला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. शुभमन गिलने गेल्या हंगामात ताबडतोड फलंदाजी करत १७ सामन्यांमध्ये ५९.३३ च्या सरासरीने ८९० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ३ शतक आणि ४ अर्धशतक झळकावली होती.

फाफ डू प्लेसी

फाफ डू प्लेसी हा देखील आयपीएल स्पर्धेतील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. या स्पर्धेती गेल्या हंगामात त्याने धावांचा पाऊस पाडला होता. त्याने १४ सामन्यांमध्ये ५६.१५ च्या सरासरीने ७३० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ८ अर्धशतक झळकावले होते. यावेळी जर त्याची बॅट तळपली तर विरोधी संघातील गोलंदाजांचं काही खरं नाही. (Cricket news in marathi)

सूर्यकुमार यादव

मुंबई इंडियन्सचा आक्रमक सूर्यकुमार यादव हा टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आपल्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने गेल्या हंगामातील १६ सामन्यांमध्ये ४३.२१ च्या सरासरीने ६०५ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले होते.

यशस्वी जयस्वाल

भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकताच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ७१२ धावा केल्या. आयपीएल २०२३ स्पर्धेतही त्याची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने १४ सामन्यांमध्ये ४८.०८ च्या सरासरीने ६२५ धावा केल्या होत्या. या हंगामातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

SCROLL FOR NEXT