Faf du Plessis amazing catch: फाफ डुप्लेसीने चे 39 वर्षे झाले असले तरी त्याची चपळता युवा खेळाडूंनाही लाजवले अशी आहे. फलंदाजी करताना खेळपट्टीवर वेगाने धावताना तर तुम्ही त्याला पाहिलंच असेल. पण त्याने नुकताच एका सामन्यात पकडलेला झेल पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही.
डुप्लेसीने पकडलेल्या या झेलची इंटरनेटवर प्रचंड चर्चा होत आहे. टेक्सास सुपर किंग्जचा (TSK) कर्णधार फाफ डुप्लेसीने सोमवारी एमआय न्यूयॉर्क (MINY) विरुद्धच्या मेजर लीग क्रिकेट (MLC) सामन्यातील क्रमांकवर खेळणाऱ्या 7 टिम डेव्हिडला बाद करण्यासाठी एक आश्चर्यकारक झेल घेतला. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
हा सामना टीएसकेने 17 धावांनी सामना जिंकला आणि डेव्हन कॉनवेला 'सामनावीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रँड प्रेरी स्टेडियमवर त्याने 55 चेंडूत 74 धावा केल्या. शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती. डॅनियल सॅम्सच्या चेंडूवर टीम डेव्हिडने चुकीचा शॉट मारला आणि चेंडू उंच गेला. चेंडू 'नो मॅन्स लँड'च्या दिशेने जात असल्याचे दिसत होते, पण सतर्क असलेल्या डुप्लेसीने चबळता दाखवत झेल टिपला. (Latest Political News)
हा झेल टिपण्यासाठी फाफ डुप्लेसी लाँग-ऑन बाऊंड्रीवरून वेगाने धावत आला आणि झेल अशक्य असताना पुढे डायव्ह करून त्याने एक अप्रतिम झेल घेतला. वयाच्या 39 व्या वर्षी फाफ डुप्लेसीच्या या फिटनेसचं आणि त्याच्या चपळ क्षेत्ररक्षणाचं क्रिकेट प्रेमींकडून खूप कौतुक होत आहे. डुप्लेसीचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेट चाहते त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट आणि लाईक्स करत आहेत. (Latest Sports News)
एमआय न्यूयॉर्कवर 17 धावांनी विजय मिळवल्यानंतर टेक्सास सुपर किंग्ज तीन सामन्यांत 4 गुणांसह गुणतालिकेत शीर्षस्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे फाफ डुप्लेसीचा डावातील हा तिसरा झेल होता. विजयानंतर फाफ डुप्लेसीने त्याच्या क्षेत्ररक्षणाविषयी बोलताना 'हा मी आहे, मला क्षेत्ररक्षण आवडते' अशी प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.