virat kohli r ashwin ravindra jadeja canva
क्रीडा

IND vs BAN: विराट २७ हजारी, जडेजा ३०० विकेट्स अन् अश्विन नंबर १.. कानपूर कसोटीत मोडले जाणार ११ मोठे रेकॉर्ड्स

Records In India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ११ मोठे रेकॉर्ड्स मोडले जाणार आहेत.

Ankush Dhavre

Records In IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने २८० धावांनी बाजी मारली. तर मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड मोडले जाणार आहेत.

पाकिस्तानला मागे सोडण्याची संधी

भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ १४ वेळेस आमनेसामने आले आहेत. यापैकी १२ वेळेस भारताने बांगलादेशला हरवलं आहे. तर २ सामने ड्रॉ राहिले आहेत. पाकिस्ताननेही बांगलादेशला १२ सामन्यांमध्ये हरवलं आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर बांगलादेशला सर्वाधिक वेळेस हरवण्याच्या बाबतीत भारतीय संघ पुढे निघू शकतो.

कसोटीत चौथा सर्वात यशस्वी संघ

भारताने आतापर्यंत १८९ कसोटी सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नावेही इतकेच सामने जिंकण्याची नोंद आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला मागे सोडेल.

विराटला ९००० धावा करण्याची संधी

तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटचा जलवा पाहायला मिळाला आहे. वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये आपली छाप सोडल्यानंतर, विराट आता कसोटीत इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. विराट कसोटीत ९००० धावा दूर करण्यापासून १२९ धावा दूर आहे. तो कसोटीत ९००० धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

विराट कोहलीकडे डॉन ब्रॅडमनला मागे सोडण्याची संधी

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये २९ शतकं झळकावली आहेत. तर डॉन ब्रॅडमनच्या नावे देखील कसोटीत २९ शतक झळावण्याची नोंद आहे. या रेकॉर्डमध्ये विराट डॉन ब्रॅडमन यांना मागे सोडेल.

विराट २७००० धावांच्या जवळ

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने वनडे, टी -२० आणि कसोटीत आतापर्यंत २६९६५ धावा क्या आहेत. अवघ्या ३५ धावा करताच तो २७००० धावा पूर्ण करणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटींगला हा कारनामा करता आला आहे.

रोहित, राहुल द्रविडला सोडू शकतो मागे

भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ शतकं झळकावण्याची नोंद आहे. या बाबतीत तो राहुल द्रविडच्या बरोबरीत आहे. दरम्यान १ शतक झळकावताच तो या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडला मागे सोडणार आहे.

आर अश्विन नाथन लायनला सोडणार मागे

भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ५२२ गडी बाद केले आहेत. कानपूर कसोटीत जर त्याने ९ गडी बाद केले, तर तो नाथन लायनला मागे सोडू शकतो. नाथन लायनच्या नावे कसोटीत ५३० गडी बाद करण्याची नोंद आहे.

आर अश्विन शेन वॉर्नला सोडणार मागे

आर अश्विन सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करण्याच्या रेकॉर्डमध्ये शेन वॉर्नला मागे सोडू शकतो. अश्विनने आतापर्यंत ३७ वेळेस हा कारनामा करुन दाखवला आहे. तर शेन वॉर्नने देखील ३७ वेळेस हा कारनामा केला होता. या यादीत मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानी आहे.

जडेजाला ३०० विकेट घेण्याची संधी

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २९९ गडी बाद केले आहेत. त्यामुळे कानपूर कसोटीत १ गडी बाद करताच तो ३०० गडी बाद करणार आहे.

जडेजा मिळवणार दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान

कानपूर कसोटीत १ गडी बाद करताच जडेजाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. तो कसोटीत ३००० धावा आणि ३०० गडी बाद करणारा जगातील दुसरा डावखूरा फिरकी गोलंदाज ठरणार आहे.

राहुलकडे ३००० धावा पूर्ण करण्याची संधी

भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलकडे कसोटीत ३००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत २९०१ धावा केल्या आहेत. त्याला हा डोंगर सर करण्यासाठी अवघ्या ९९ धावांची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT