Tokyo Olympic : एका तासात पी.व्ही सिंधूची दमदार कामगिरी  Twitter/@ANI
Sports

Tokyo Olympic : एका तासात पी.व्ही सिंधूची दमदार कामगिरी

या विजयासह सिंधूने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधू दुसर्‍या फेरीत हाँगकाँगच्या चेउंग नॅगनशी सामना करेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tokyo Olympic 2020

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने (P.V. Sindhu) टोकियो ऑलिम्पिकमधील विजयासह सुरुवात केली. महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात तिने इस्त्राईलच्या (Israel) केसेनिया पोलिकार्पोव्हाला (Kesenia Polikarpova) सहज पराभूत केले. सिंधूने केसेनिया पोलिकार्पोव्हाविरुद्ध 29 मिनिटांत 21-7 आणि 21-10 असा सामना जिंकला. (PV Sindhu defeated Kesenia Polikarpova of Israel)

या विजयासह सिंधूने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधू दुसर्‍या फेरीत हाँगकाँगच्या चेउंग नॅगनशी सामना करेल. दोन्ही खेळाडूंमधील सामना 27 जुलै रोजी होणार आहे. पहिल्या गेममध्ये सिंधूने इस्राईलच्या प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवण्याचे सामर्थ्य दाखवून 13 गुण मिळवले. ब्रेकनंतर पी. व्ही सिंधू ११-५ ने अशी आघाडीवर होती. त्यानंतर सिंधूने आघाडी कायम राखली आणि पहिल्या गेममध्ये त्याने 13 मिनिटांत 21-7 अशी दमदार कामगिरी केली.

दुसऱ्या खेळातही सिंधूने आपली उत्तम कामगिरी कायम ठेवली. या दरम्यान खेळाच्या ब्रेकपर्यंत 11-4 अशी आघाडी घेतली. या दरम्यान, केसेनिया पोलिकार्पोव्हानेही अनेक वेळा बाजी मारण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूच्या शॉट्स आणि खेळीसमोर ती टिकाव धरू शकली नाही. याचा फायदा घेत सिंधूने 16 मिनिटांत दुसरा सामना 21-10ने जिंकला.

या विजयासह जगातील सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. सिंधूची ही दुसरी ऑलिम्पिक असून महिला एकेरीत तिला सहावे मानांकन मिळाले आहे. दुसर्‍या फेरीत सिंधूचा सामना हाँगकाँगच्या चेउंग नॅगनशी होईल.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News: 500 रुपयांची नोट बंद होणार? ATMमध्ये 100-200 च्याच नोटा मिळणार? काय आहे सत्य, जाणून घ्या

नर्तिकीच्या नादात माजी उपसरपंचाने गोळी झाडून आयुष्य संपवलं, मेहुण्याने जे सांगितलं ते वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: मुरुम उत्खनन प्रकरणात अजित पवारांची कोंडी? मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या दोन तऱ्हा, कुठे ऊन तर कुठे पाऊस? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Kunbi Maratha : सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

SCROLL FOR NEXT