Tokyo Olympic 2020 : दिपीका कुमारी क्वार्टर फायनल्समध्ये Saam Tv
Sports

Tokyo Olympic 2020 : दिपीका कुमारी क्वार्टर फायनल्समध्ये

भारताला तिरंदाजीत दिपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोकियो - टोक्यो ऑलिम्कि Tokyo Olympic २०२० मधून भारतासाठी एक खूशखबर आली आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीने Deepika Kumari टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपिका कुमारीने रशियन Russia ऑलिम्पिक सेनिया पेरोव्हाचा पराभव करत महिला एकेरीच्या क्वार्टर फायनल्स प्रवेश केला आहे. पाच सेटनंतर या दोन्ही तिरंदाजांमध्ये ५-५ अशी बरोबरी झाली होती.

हे देखील पहा -

नंतर तिने यशस्वीपणे सामना करत शूटऑफमध्ये परफेक्ट १० स्कोअर केला. एका निशाण्यावर निर्णय होणाऱ्या शूटऑफमध्ये रशियन तिरंदाज पेरोव्हा दबावाखाली दिसून आली आणि केवळ ७ गुण मिळवता आले. तर दीपिकाने परफेक्ट १० स्कोअर करत पेरोव्हाला ६-५ अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह ऑलिम्पिक तिरंदाजीमध्ये क्वार्टर फायनल्स  गाठणारी भारताची पहिली तिरंदाज ठरली आहे. आता भारताला तिरंदाजीत दिपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. 

दिपिका कुमारीला आज क्वार्टर फायनल्सचा  सामना खेळावा लागणार आहे. दिपिका कुमारी सोबत अतून दासनेही  क्वार्टर फायनल्समध्ये आपले स्थान मिळवले आहे. सकाळी ११.३० वाजता दिपिका सामन्यासाठी मैदानात उतरणार असून तिचा सामना कोरियाच्या एन सेनसोबत होणार आहे. पण भारतासाठी दिपिका हा खडतर मार्ग पार करत पदक जिंकेल अशी आशा संपूर्ण भारताला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT