Tokyo Olympics 2020 : भारताचे आणखी एक मेडल नक्की! लवलीनाची फायनलमध्ये धडक

टोकयो ऑलिम्पिक मध्ये भारताचे आणखी एक मेडल नक्की झाले आहे.
Tokyo Olympics 2020 : भारताचे आणखी एक मेडल नक्की! लवलीनाची फायनलमध्ये धडक
Tokyo Olympics 2020 : भारताचे आणखी एक मेडल नक्की! लवलीनाची फायनलमध्ये धडकSaam Tv

टोकयो : टोकयो ऑलिम्पिक Tokyo Olympics मध्ये भारताचे India आणखी एक मेडल नक्की झाले आहे. भारताची बॉक्सर Boxer लवलीना बोरगहेन Lovelina Borgohen ६९ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पर्धेत सेमी फायमलमध्ये थेट प्रवेश केले आहे. लवलीनाने चीनच्या निएन चिन चेनचा पराभव करत, सेमी फायनलमध्ये प्रवेश केले आहे. बॉक्सिंग मध्ये ब्रॉन्झ मेडलकरिता मॅच होत नाही.

हे देखील पहा-

यामुळे सेमी फायनलच्या मॅचचा निकाल काही लागला तरी लवलीनाचे मेडल नक्की ठरले आहे. यापूर्वी लंडन London ऑलिम्पिकेत मेरी कोमने ब्रॉन्झ मेडल देखील पटकावले होते. यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकणारी लवलीना ही दुसरी बॉक्सर ठरली आहे. लवलीना या मॅच मध्ये ३ राऊंडमध्ये जोरदार खेळ करत निएन चेनला कोणतीही संधी दिलेली नाही.

लवलीना ही आसाम येथील पहिलीच महिला बॉक्सर आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या लवलीनाकडून यंदा पदकाची मोठी अपेक्षा राहणार आहे. तिने या अपेक्षा पूर्ण करत स्वतः चे मेडल निश्चित केले आहे. भारताच्या सतीश कुमारने देखील जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला नमवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे.

Tokyo Olympics 2020 : भारताचे आणखी एक मेडल नक्की! लवलीनाची फायनलमध्ये धडक
Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य

९१ किलो वजनगटामधील बॉक्सिंगमध्ये ४-१ अशा मोठ्या फरकाने सतीशने हा सामना स्वतः च्या खिशात घातला होता. पहिला राऊंड ५-० ने जिंकल्यावर, सतीशने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ४-१ ने विजय मिळवले आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्यावर ऑलिम्पिक पदक मिळवण्याकरिता सतीशला केवळ एक टप्पा ओलांडायचा राहिला आहे. भारताची आणखी एक बॉक्सर पूजा राणी देखील या पदकापासून फक्त एक विजय पाठीमागे राहिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com