Tim Southee  Saam Tv
Sports

Tim Southee Record :जे भल्या भल्या दिग्गजांना नाही जमलं ते साऊदीने करून दाखवलं, असा कारनामा करणारा ठरलाय पहिलाच गोलंदाज

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Tim Southee Record:सध्या इंग्लंड संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवत १-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टनच्या मैदनावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. (Latest Sports Updates)

टीम साऊदी हा न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. नुकताच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो न्यूझीलंड संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम डॅनियल विटोरीच्या नावावर होता. विटोरीने न्यूझीलंड संघासाठी ६९६ गडी बाद केले आहेत. तसेच ७०० किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टीम साऊदीने १५ वे स्थान मिळवले आहे.

तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज देत स्टेनला मागे सोडलं आहे. डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९९ गडी बाद केले होते.

तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानी आहे. मुरलीधरनने १३४७ गडी बाद केले आहेत. तर शेन वॉर्नच्या नावे १००२ गडी बाद करण्याची नोंद आहे.

तर तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. त्याने आतापर्यंत एकूण ९६९ गडी बाद केले आहेत. तर ९५६ गडी बाद करत अनिल कुंबळे चौथ्या स्थानी, ग्लेन मॅकग्रा ९४९ गडी बाद करत चौथ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धाचा फटका, 15 एप्रिलपासून वर्क फ्रॉम; 'या' देशाने घेतला निर्णय, VIDEO

Pune Rain: भर पावसात डिलिव्हरी बॉय पाण्यात पडला, पुण्यातील भावनिक VIDEO व्हायरल

मुंबईतील लोकल गर्दी कमी होणार, रेल्वेने घेतला गेमचेंजर निर्णय; महत्वाची माहिती आली समोर

Vastu Tips For Office Desk: ऑफिसच्या डेस्कवर या 5 चुका केल्याने तुमचं करिअर होईल उद्ध्वस्त, वेळीच व्हा सावध

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT