आयएसपीएल २०२५ स्पर्धेचा थरार ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये पार पडला. स्पर्धेतील फायनलमध्ये माझी मुंबई आणि श्रीनगर के वीर हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दुसऱ्या हंगामाची ट्रॉफी उंचावण्यासाठी दोन्ही संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली.
श्रीनगर के वीर संघाने प्रथम फलंदाजी १० षटक अखेर ५ गडी बाद १२० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने शानदार कामगिरी करत ३ गडी राखून विजय मिळवला.
श्रीनगर के वीर संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाने १० षटक अखेर ५ गडी बाद १२० धावा केल्या.
या संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज आकाश तरेकरने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तर सागर अलीने ४० धावांची खेळी केली. माझी मुंबई संघाला हा सामना जिंकण्यासाठी १० षटकात १२१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाकडून रजत मुंडेने २३ धावांची खेळी केली.
त्यानंतर महेंद्र चंदनने १३ धावा केल्या. शेवटी बिरेंद्र राम आणि विजय पावलेने तुफान फटकेबाजी केली. ५०–५० षटकात मुंबईने सामना आपल्या दिशेने खेचून आणला आणि हा सामना आपल्या नावावर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.