भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय संघाने जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा ठोकल्या होत्या. तर धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ३३७ धावा केल्या.
या विजयासोबतच भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्याचा हिरो ठरला तो द्विशतकवीर शुभमन गिल..
शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध २०८ धावांची जबरदस्त खेळी केली. १४९ चेंडूत गीलने हे द्विशतक साजरे केले. ज्यामध्ये १९ चौकारांसह ९ षटकारांचा समावेश होता.
या द्विशतकासह शुभमन गिलचा द्विशतक ठोकणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे.त्याचबरोबर तो अशी कामगिरी करणारा सर्वात युवा खेळाडूही ठरला आहे.
भारतीय संघाकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वप्रथम द्विशतक ठोकले होते. २४ फेब्रूवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. यावेळी सचिनने १४७ चेंडूत २१ चौकार तीन षटकारांसह २०० धावा कुटल्या होत्या.
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक ठाेकले होते. ८ डिसेंबर २०११ मध्ये सेहवागने १४९ चेंडूत २१९ धावा कुटल्या होत्या. ज्यामध्ये २५ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.
हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) हा पराक्रम तब्बल तीन वेळा केला आहे. रोहितने सर्वप्रथम २ नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०८ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ ला ईडन गार्डनवर त्याने २६४ धावांची खेळी केली होती.
ही खेळी एकदिवसीय क्रिकेटमधील आत्तापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्धचं मोहालीमध्ये तिसरे द्विशतक ठोकले होते. १३ डिसेंबर २०१७ मध्ये रोहितने लंकेविरुद्ध २०९ धावांची खेळी केली होती.
भारतीय संघाचा युवा फलंदाज ईशान किशनने डिसेंबर २०२२ मध्ये द्विशतक ठोकले आहे. ईशानने १० डिसेंबर २०२२ ला बांग्लादेशविरुद्ध २१० धावा ठोकल्या होत्या. त्याच्या या खेळीत २४ चौकारांसह १० षटकारांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.