IND v NZ 1st ODI : हत्ती गेला पण शेपटानं घामच फोडला! अखेरच्या षटकात भारताचा थरारक विजय, पाहा VIDEO

हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव करत विजय मिळवला आहे.
IND v NZ 1st ODI Live
IND v NZ 1st ODI LiveSaam TV
Published On

IND v NZ 1st ODI : हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव करत विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित षटकांत आठ गडी गमावून ३४९ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना किवीचा संघ ४९.२ षटकांत ३३७ धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाने पहिल्या वनडेत १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. (Latest Marathi News)

IND v NZ 1st ODI Live
Shubman Gill : 'रनमशीन' गिलनं मोडले 'विराट' रेकॉर्ड; अवघे १९ डाव अन् दिग्गज चीतपट

शुभमन गिलच्या २०८ धावांच्या जोरावर भारताला ३४९ धावांचे आव्हान न्यूझीलंडपुढे ठेवलं होतं. लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलामीवर फिन ए्ँलेन ४० तर डेवोन कॉन्वे १० धावा करून आऊट झाला होता. यानंतर मैदानात उतरलेला खेळाडू एकेरी दुहेरी धावसंख्या आऊट झाला होता. (Sports News)

निकोलस १८, मिचेल ९, ट़ॉम लॅथम २४, ग्लेन फिलीप ११ धावा करून आऊट झाले होते. न्यूझीलंड हा सामना गमावेल असं वाटत होतं. कारण न्यूझीलंडची ४ बाद ८९ अशी अवस्था झाली होती. दरम्यान, मधल्या फळीचा विस्फोटक फलंदाज मायकल ब्रेसवेलने सामन्यात चांगलीच रंगत भरली. त्याने ७८ चेंडूंत १४० धावा चोपल्या.

त्याला मिचेल सँटनरने सुयोग्य साथ दिली. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला विजयाची आशा दिसत होती. मिचेल सँटनरने यावेळी ५७ धावांची दमदार खेळी साकारली आणि त्याची ही खेळी ब्रेसवेलला आधार देणारी ठरली. अखेरच्या षटकात त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले आणि भारताला १२ धावांनी विजय मिळवून दिला.

या विजयाह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मोहम्मद सिराजने या सामन्यात सर्वाधिक ४ विकेट्स मिळवल्या. भारताकडून शुभमन गिलने (Shubman Gill)  धमाकेदार द्विशतक झळकावलं. त्याच्या या कामगिरीने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com