ipl auction twitter
Sports

IPL 2025 Mega Auction: IPL मेगा ऑक्शनमध्ये हे नवे नियम लागू केले जाणार? किती खेळाडू रिटेन करता येणार?

IPL Mega Auctions New Rules: आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. दरम्यान कोणते नवे नियम लागू केले जाणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. या ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर ३१ जुलै रोजी बीसीसीआय आणि फ्रेंचायझींच्या मालकांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएल २०२५ स्पर्धेत नवीन नियम लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान सर्वात महत्वाचा नियम म्हणजे या मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करण्यात येणार? जाणून घ्या.

मेगा ऑक्शनमधील ३ सर्वात मोठ्या अपडेट म्हणजे, ३१ जुलै रोजी बीसीसीआय आणि आयपीएल स्पर्धेतील फ्रेंचायझी मालक यांच्यात बैठक पार पडली होती. या बैठकीदरम्यान काही फ्रंचायझी मालकांनी मेगा ऑक्शनच्या आयोजनालाच विरोध केला होता. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, मेगा ऑक्शन होणारच. कारण बीसीसीआय कुठल्याही परिस्थितीत मेगा ऑक्शन रद्द करण्याच्या मुडमध्ये नाहीत.

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार, असं समजताच, किती खेळाडू रिटेन करता येणार? याबाबत चर्चा रंगली. आयपीएलच्या नियमानुसार, मेगा ऑक्शनपूर्वी सर्व फ्रेंचायझींना आपल्या संघात ३-४ खेळाडू रिटेन करता येतात. मात्र फ्रेंचायझींनी ६ खेळाडू रिटेन करता यावे असा प्रस्ताव ठेवला. या मागणीला बीसीसीआय हिरवं कंदील दाखवू शकते.

मेगा ऑक्शनपूर्वी ६ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली जाऊ शकते. यासह रिटेन आणि राईट टू मॅचचा पर्यायही उपलब्ध असेल.

केव्हा होणार आयपीएल २०२५ स्पर्धेचं आयोजन?

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव कधी होणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी मेगा ऑक्शन येत्या डिसेंबर २०२४ किंवा फेब्रुवारी २०२५ आयोजित केले जाऊ शकते. त्यानंतर एप्रिल महिन्यात आयपीएल २०२५ स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते.

आयपीएल २०२४ स्पर्धेत केकेआरने पटकावलं जेतेपद

आयपीएल २०२४ स्पर्धेचे आयोजन निवडणूका असतानाही भारतात करण्यात आले होते. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने शानदार कामगिरी केली होती. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली आणि तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT