rohit sharma with virat kohli twitter
Sports

T20 World Cup: रोहित अन् विराट कोहलीसह या 2 दिग्गजांनीही घेतली T20I क्रिकेटमधून निवृत्ती

Players Announced Retirement From T20I: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी शेवटची स्पर्धा ठरली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही भारतीय क्रिकेट फॅन्सला दिलासा देणारी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने अखेर टी -२० वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. विजयानंतर जगभरातील क्रिकेट फॅन्स जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. मात्र सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करत क्रिकेट फॅन्सला मोठा धक्का दिला. दरम्यान जाणून घ्या कोण आहेत आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतून निवृत्ती जाहीर करणारे खेळाडू.

विराट कोहली

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये विराट कोहलीने निर्णायक खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मात्र दिलासा देणारी बाब अशी की,तो वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येईल.

रोहित शर्मा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. फायनल झाल्यानंतर रोहितनेही निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असला तरीदेखील तो वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसेल.

ट्रेंट बोल्ट

न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला शेवटचा सामना खेळला आहे. या स्पर्धेत न्युझीलंडला साखळी फेरीतूनच बाहेर पडावं लागलं. या फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली.

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड होणारने याआधीच वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. टी-२० वर्ल्डकप ही त्याची शेवटची स्पर्धा होती. दरम्यान सुपर ८ फेरीतून बाहेर पडताच त्याने निवृत्तीची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT