team india twitter
क्रीडा

Team India News: सुपर ८ मध्ये टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार; रोहित या दोघांपैकी एकाला दाखवणार बाहेरचा रस्ता

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने शेवटच्या टप्प्यात आहेत. हे सामने संपल्यानंतर सुपर ८ सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. हा सामना बारबाडोसच्या केनिंग्स्टन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

या दोघांपैकी कोणाला मिळणार संधी?

भारताचा डावखुऱ्या हाताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याचा टी -२० क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला तर त्याने १७ सामन्यांमध्ये १६१.९४ च्या स्ट्राइक रेटने ५०२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ४ अर्धशतक देखील झळकावली आहेत. तर दुसरीकडे शिवम दुबेबद्दल बोलायचं झालं तर, त्याने भारतीय संघाकडून २४ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १३१.३६ च्या स्ट्राइक रेटने ३१० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतक झळकावले आहेत.

यशस्वी जयस्वालला आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र इथून पुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघ जर डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजी कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार असेल तर यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

असं झाल्यास शिवम दुबेला प्लेइंग ११ मधून बाहेर व्हावं लागेल. कारण भारतीय संघात रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या असे ३ अष्टपैलू खेळाडू आहेत. तर यशस्वी जयस्वाल सलामीला येऊन भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो. त्यामुळे पुढील सामन्यात यशस्वी जयस्वाल सलामी करताना दिसून येऊ शकतो.

टी -२० वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

SCROLL FOR NEXT