अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला ११२ इतक्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. पंजाब किंग्जने या सामन्यात १६ रन्सने कोलाकात्याचा पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना १११ रन्स केले. मात्र या आव्हानाचा सामना करताना कोलकात्याची टीम अवघ्या ९५ रन्समध्ये पव्हेलियनमध्ये परतली.
कोलकाता फलंदाजी करताना ६२ रन्सवर २ विकेट अशी टीमची अवस्था होता. कर्णधार रहाणेची विकेट गेल्यानंतर टीमला ७५ चेंडूंमध्ये ५० रन्सची गरज होती. मात्र उर्वरित टीम पत्त्यांप्रमाणे ढेपाळली आणि कोलकात्यावर पराभवाची नामुष्की आली.
आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात छोटा स्कोर होता जो टीमने डिफेंड केला. रहाणेने १७ चेंडूंमध्ये १७ रन्स केले. यावेळी तो चहलच्या गोलंदाजीवर एलबीडब्लू आऊट झाला. मात्र त्यानंतर टीममधील इतर कोणत्याही फलंदाजाला चांगला खेळ करत टीमला जिंकवून देता आलं नाही. दरम्यान सामन्यानंतर अजिंक्य रहाणेने पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे.
पंजाबविरूद्ध झालेल्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला की, या पराभवाची जबाबदारी पूर्णपणे मी घेतो. मी चुकलो, चुकीचा शॉट खेळला आणि तेव्हाच याची सुरुवात झाली. मला त्यावेळी कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. विकेट सोपी नव्हती पण १११ रन्सचं टार्गेट पूर्ण करणं शक्य होतं. आम्ही फलंदाजी फार खराब केली. गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजीसमोर चांगला खेळ केला.
रहाणे पुढे म्हणाला की, आम्ही काही प्रमाणात बेजबाबदारपणे खेळलो. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरु होत्या. सध्या मी फार निराश आहे. मला स्वतःला सध्या शांत राहून विचार करण्याची गरज आहे की, टीममधील मुलांशी मी काय बोलणार आहे.
अजिंक्य रहाणेनंतर टीमच्या ७२ च्या स्कोरवर अंगक्रिश रघुवंशीला ३७ रन्सवर युजवेंद्र चहलने कॅच आऊट केलं. यानंतर ७४ च्या स्कोरवर व्यंकटेश अय्यर, ७६ च्या स्कोरवर रिंकु सिंह आणि रमनदिप सिंह आऊट झाले. अखेरीस ९५ रन्सवर संपूर्ण कोलकात्याची टीम पव्हेलियनमध्ये परतली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.