T 20 World Cup 2026 Schedule Update team India Favourite saam tv
Sports

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

T20 World Cup 2026 India squad: टी२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात शनिवारी होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान पार पडणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

7 फेब्रुवारीपासून टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानच्या टीमने घातलेल्या गोंधळानंतर टीम इंडिया २०२६ च्या वर्ल्डकपमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झालीये. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. श्रीलंका भारतासोबत २०२६ च्या टी२० वर्ल्डकपचं यजमानपद भूषवतेय.

टीम इंडिया ही टी-२० वर्ल्डकप गतविजेती आहे. २०२४ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून २०२४ चा टी२० वर्ल्डकप जिंकला होता. जर कोणत्याही टीमने सलग दोनदा टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. अशातच टीम इंडिया वर्ल्डकप जिंकण्यासाठी दावेदार मानली जातेय.

भारताच्या गटात अजून कोणत्या टीम्सचा समावेश?

टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप एमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त त्यात पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्सच्या टीम्साचाही समावेश आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया अमेरिकेविरूद्ध मैदानात उतरणार आहे.

त्यानंतर १२ तारखेला अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाशी सामना आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यावरून मोठा गदारोळ माजला होता. १८ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना खेळला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये ४ ग्रुप आहेत आणि प्रत्येक गटातील टॉप-२ टीम्सना सुपर-८ मध्ये स्थान मिळणार आहे.

कसं आहे टीम इंडियाचं वर्ल्डकपचं शेड्यूल?

  • ७ फेब्रुवारी २०२६- भारत विरुद्ध अमेरिका, वानखेडे स्टेडियम, मुंबई, संध्याकाळी ७:०० वाजता

  • १२ फेब्रुवारी २०२६- भारत विरुद्ध नामिबिया, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली, संध्याकाळी ७:०० वाजता

  • १५ फेब्रुवारी २०२६- भारत विरुद्ध पाकिस्तान, आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, संध्याकाळी ७:०० वाजता

  • १८ फेब्रुवारी २०२६- भारत विरुद्ध नेदरलँड्स, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, संध्याकाळी ७:०० वाजता

सूर्याच्या नेतृ्त्वाखाली उतरणार टीम इंडिया

टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. यावेळी टीमचा अक्षर पटेल उपकर्णधार असणार आहे. गेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टीमने एकही सिरीज गमावलेली नाही. या टीममध्ये जगातील नंबर वन टी-२० फलंदाज अभिषेक शर्मा आणि नंबर वन गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडिया?

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयंकर अपघात, चिमुकल्या बहीण-भावाला ट्रेम्पोनं चिरडलं, हसत्या-खेळत्या घरावर दु:खाचा डोंगर

Nanded ZP School: जिल्हा परिषदेची शाळा कोणत्या गावाची? शाळेचा वाद थेट पोलिसांच्या दारात, काय आहे प्रकरण?

दिव्यांग बोगस प्रमाणपत्र प्रकरण अंगलट; 3 बड्या अधिकऱ्यांचे निलंबन तर तिघांना बडतर्फ

1 Gram Gold Mangalsutra: सोन परवडत नाही? पण सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे? ट्राय करा 1 ग्रॅम सोन्याचे ट्रेंडी मंगळसूत्र

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांनी येवल्याच्या प्रांताधिकारी कार्यालयावर फेकले कांदे

SCROLL FOR NEXT