ऑलिम्पिक मधील सर्वात वृद्ध नेमबाजाने पदक जिंकत रचला इतिहास Saam Tv
Sports

ऑलिम्पिक मधील सर्वात वृद्ध नेमबाजाने पदक जिंकत रचला इतिहास

58 वर्षाचं वय म्हणजे 'निवृत्त' व्हायचं वय. परंतू या वयात ऑलिम्पिक पदक (Olympics Medal) जिंकणं म्हणजे खरचं कौतुकास्पद आहे.

वृत्तसंस्था

58 वर्षाचं वय म्हणजे 'निवृत्त' व्हायचं वय. परंतू या वयात ऑलिम्पिक पदक (Olympics Medal) जिंकणं म्हणजे खरचं कौतुकास्पद आहे. ही करामत करुण दाखवली आहे कुवेतच्या अब्दुल्ला अल रशिदी (Abdullah Al-Rashidi) यांनी, त्यांच्यासाठी वय केवळ एक आकडा आहे. ऑलिम्पिक 2020 मध्ये झालेल्या स्कीट स्पर्धेत सोमवारी त्यांनी कांस्यपदक जिंकले. त्यांनी हे पदक शुटिंगमध्ये जिंकले आहे. अल रशिदी यांनी कांस्यपदक तर जिंकलेच परंतू, त्यांनी 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा वादा केला आहे.

असाका येथील नेमबाजी रेंजवर अल रशिदी म्हणाले, “मी 58 वर्षांचा आहे. आणि या ऑलिम्पिक मधील सर्वात वृद्ध खेळाडू आहे. हे कांस्यपदक माझ्यासाठी सुवर्ण पदाकापेक्षाही मोठे आहे. या पदकामुळे मी खूप आनंदी आहे. परंतु पुढील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची आशा आहे''. पुढे अल रशिदी म्हणाले, '' माझं नशिब खराब आहे मी सुवर्ण पदक जिंकू शकलो नाही. परंतू मी कांस्य पदकामध्ये खूश आहे. मला आशा आहे की 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये मी सुवर्ण पदक जिंकेल तेव्हा मी 61 वर्षाचा असेल.

दरम्यान, ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) मधील सर्वात युवा खेळाडू जपानची मोमिजी निशियाने (Momiji Nishiya) अवघ्या 13 व्या वर्षी सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले आहे. दरम्यान, सोमवारचा दिवसही भारतीय खेळाडूंसाठी फारसा चांगला दिवस नव्हता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतीय खेळाडूंना फारसे यश मिळाले नाही. जपानची 13 वर्षांची सुवर्ण पदक विजेती मोमिजी निशिया टोकियो 2020 मधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती ठरली आहे. तिने महिला वैयक्तिक स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT