भारतीय कुस्ती महासंघाकडून कुस्तीपटू विनेश फोगाटचे निलंबन  Saam tv news
Sports

भारतीय कुस्ती महासंघाकडून कुस्तीपटू विनेश फोगाटचे निलंबन

विनेश फोगटने इतर खेळाडूंसोबत एकाच मजल्यावर राहण्यास आणि संघातील सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुस्तीपटू विनेश फोगाट (Wrestler Vinesh Fogat) आणि सोनम मलिक (Sonam Malik) यांना टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) पराभवानंतर मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगटला भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) तात्पुरते निलंबित केले आहे. त्याचबरोबर सोनम मलिकलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. विनेश आणि सोनम या दोघांनीही नियमांचे पालन न केल्याचा आरोप महासंघाने केला आहे. विनेश फोगाटवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (Wrestler Vinesh Fogat has been suspended by the Indian Wrestling Federation)

विनेशने ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाची अधिकृत किट प्रायोजकांची जर्सीही घातली नव्हती. यामुळे विनेशला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, विनेश फोगटने इतर खेळाडूंसोबत एकाच मजल्यावर राहण्यास आणि संघातील सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला. भारतातून आलेल्या इतर खेळाडूंमध्ये राहिली तर तिला कोरोना व्हायरस होऊ शकतो. विनेश आणि सोनम या दोघीनांही दुसऱ्या मजल्यावर एक खोली हवी होती. या दोघींनीही इतर पैलवानांसोबत एकही दिवस घालवला नाही आणि त्यांच्याबरोबर सराव केला नाही. आता विनेशला 16 ऑगस्टपर्यंत नोटीसला उत्तर द्यायचे आहे.

हे देखील पहा -

डब्ल्यूएफआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "हे नियमांचे उल्लंघन आहे. त्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे आणि कुस्तीशी संबंधित सर्व उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांचे प्रतिसाद येईपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय किंवा इतर देशांतर्गत स्पर्धेत विनेशला भाग घेता येणार नाही आणि WFI अंतिम निर्णय घेईल. तर दुसरीकडे, आयओएने डब्ल्यूएफआयला नोटीस पाठवून ते त्यांच्या खेळाडूंवर नियंत्रण का ठेवू शकत नाहीत याबद्दल डब्ल्यूएफआयला फटकारले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT