tejaswin shankar , india, common wealth games 2022, high jump, bronze medal
tejaswin shankar , india, common wealth games 2022, high jump, bronze medal saam tv
क्रीडा | IPL

Tejaswin Shankar : फेडरेशननं डावललं, न्यायालयानं तारलं; तेजस्विन शंकरनं जिंकलं

Siddharth Latkar

Birmingham : काॅमन वेल्थ गेम्स (Common Wealth Games 2022) स्पर्धेत देशातील वेटलिफ्टर, लाॅन बाॅल्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन खेळाडूंपाठापाेठ आता मैदानी क्रीडा (sports) प्रकारातील खेळाडूंनी दबदबा निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा श्री गणेशा तेजस्विन शंकरनं (Tejaswin Shankar) उंच उडीत (High Jump) मध्ये कांस्यपदक (Bronze Medal) पटकावित केले आहे. शंकरनं (2.22 मीटर) उंच उडी मारत हे यश मिळविले आहे. (Common Wealth Games 2022 Latest Marathi News)

तेजस्विनने पहिल्या प्रयत्नात (2.10 मीटर) त्यानंतर (2.15 मीटर) तसेच (2.22 मीटर) उंच उडी मारली. न्यूझीलंडचा हामिश केर आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रँडन स्टार्क (2.25 मीटर) यांनी उंच उडी मारत आघाडी घेतली. त्यांचे आव्हान तेजस्विन शंकरला पार करता आले नाही.

खरं तर काॅमन वेल्थ गेम्स क्रीडा स्पर्धेत तेजस्विन शंकरला एथलेटिक्स फेडरेशननं पहिल्यांदा भारतीय संघात डावललं. त्याने आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते. अखेरच्या क्षणी दिल्ली उच्च न्यायायलाच्या आदेशाने त्याचा भारतीय संघात समावेश झाला हाेता.

शंकरनं केलेल्या कामगिरीची नेटीझन्सह मान्यवरांनी दखल घेत त्याचे अभिनंदन करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

Buldhana Accident : ट्रक- डंपरची धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT