team india weaknesses  saam tv
क्रीडा

Team India Weaknesses: ...तर टीम इंडियाचं चॅम्पियन होणं कठीण, रोहित ब्रिगेड समोरील ३ मोठी आव्हाने

Asia Cup 2023 Latest Updates: आशिया चषकात भारतीय संघासमोर ३ मोठी आव्हानं असणार आहे.

Ankush Dhavre

Team India Weaknesses In Asia Cup 2023:

पाकिस्तान विरूद्ध नेपाळच्या सामन्याने आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेला पाकिस्तानचा संघ विजयी सलामी देण्याच्या विचारात असणार आहे. २ सप्टेंबर रोजी भारतीय संघाचा सामना पाकिस्तान संघासोबत होणार आहे.

पाकिस्तानची गेल्या काही सामन्यांमधील कामगिरी पाहिली तर,हा संघ भारतीय संघाला कडवी झुंज देऊ शकतो. ही स्पर्धा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

कारण येत्या काही दिवसात भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघासमोर ३ प्रश्न असणार आहेत. ज्याचा तोडगा भारतीय संघाला शोधून काढावा लागणार आहे.

गोलंदाजांच फलंदाजी न करणं..

भारतीय संघात एकापेक्षा एक भेदक गोलंदाज आहेत. आशिया चषकात भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव हे ४ गोलंदाज खेळताना दिसून येणार आहेत.

हे गोलंदाज आशिया चषकातील प्रत्येक सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतात. गोलंदाजीत हे गोलंदाज विकेट्स काढून देऊ शकतात.

मात्र आपण जेव्हा फलंदाजीबद्दल बोलतो, तेव्हा हे कुठेतरी कमी पडतात. रविंद्र जडेजाला सोडलं तर इतर कुठलेही गोलंदाज शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळू शकत नाही.

वर्ल्डकप जिंकायचा असेल तर भारतीय गोलंदाजांनाही फलंदाजीत योगदान द्यावं लागणार आहे.

दुखापतग्रस्त खेळाडूंचा फॉर्म...

आशिया चषकासाठी दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंना देखील स्थान दिले गेले आहे. ज्यात श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह सारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. नुकताच आयर्लंडविरूद्ध झालेल्या मालिकेत जसप्रीत बुमराहने दमदार कमबॅक केले होते.

त्यामुळे तो फॉर्ममध्ये परतलाय हे तर सिद्ध झालंय. मात्र श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे कसे खेळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दोघांनी सराव सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली होती.

मात्र केएल राहुल सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांना मुकणार आहे. तर श्रेयस अय्यर कशी कामगिरी करतो, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. (Latest sports updates)

डाव्या हाताच्या गोलंदाजांचा सामना...

डाव्या हाताचे गोलंदाज हे नेहमीच भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये डाव्या हाताचे फिरकी आणि वेगवान गोलंदाज आहेत.

या गोलंदाजांचा सामना करणं भारतीय टॉप ऑर्डरला नेहमीच कठीण जातं. त्यामुळे भारतीय संघाला जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर डाव्या हाताच्या गोलंदाजांविरूद्ध रणनिती करून मैदानात जावं लागणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT