India vs Afghanistan saam tv
Sports

India vs Afghanistan: टीम इंडियाने जिंकला टॉस, भारताची प्रथम फलंदाजी; मानव सुथार करणार टेस्ट डेब्यू

India Test Match: भारताचा कर्णधार शुभमन गिलने अफगाणिस्तानविरुद्धच्या पंजाब टेस्टमध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मानव सुथारने भारताकडून पदार्पण केले असून टीम इंडिया मोठा स्कोअर उभारण्याच्या तयारीत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टेस्ट सामना आज पंजाबमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ मोठा स्कोर उभारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरली आहे. या सामन्यात मानव सुथार या खेळाडूचा भारताकडून डेब्यू होणार आहे.

कशी आहे खेळपट्टी?

पंजाबची खेळ पट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय टीमकडे अनुभवी आणि आक्रमक फलंदाजांची फळी असल्याने सुरुवातीपासूनच वेगाने रन्स करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचवेळी कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल.

अफगाणिस्तानची टीमही भारताला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. रहमानुल्लाह गुरबाज, रहमत शाह आणि अजमतुल्लाह उमरजई यांच्यासारखे खेळाडू टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. टीम इंडिया घरच्या मैदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अफगाणिस्तानची टीम दमदार कामगिरी करत विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरली आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

केएल राहुल, यशस्वी जायसवाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

अब्दुल मलिक, रहमानुल्लाह गुरबाज, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, अफसर जजई (विकेटकीपर), अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, कैस अहमद, जिया शरीफी, नांगेयालिया खरोटी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT